वधू पाहत होती वाट, पण वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, 6 जणांचा जागीच मृत्यू, हादरवणारी घटना
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
याठिकाणी स्व. विजय रविदास यांच्या मुलीचे लग्न खडगपूर येथील गोवड्डा याठिकाणी जुळले होते. इकडे वरपक्षाची वाट पाहत असताना ते वेळेवर न पोहोचल्याने त्यांच्या संपर्क करण्यात आला.
सत्यम कुमार, प्रतिनिधी
भागलपुर : सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. यातच आता एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी वधूसह सर्वजण वरासह वरपक्षाची वाट पाहत होते. मात्र, वरात अर्ध्या रस्त्यातूनच परत गेली आणि एक अत्यंत दु:खद घटना समोर आली.
ही घटना भागलपूरच्या गोपालीचाक येथील आहे. याठिकाणी स्व. विजय रविदास यांच्या मुलीचे लग्न खडगपूर येथील गोवड्डा याठिकाणी जुळले होते. वऱ्हाडी लग्नासाठी येत असताना ओव्हरलोड ट्रकचे टायर फुटले आणि तो अनियंत्रित झाल्याने तेथून जात असलेल्या वरातीच्या गाडीवर पडला. यामुळे वरातीत सहभागी झालेल्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वरात अर्ध्या रस्त्यातूनच परत गेली आणि मुलाकडच्या लोकांनी लग्नाला नकार दिला.
advertisement
इकडे वरपक्षाची वाट पाहत असताना ते वेळेवर न पोहोचल्याने त्यांच्या संपर्क करण्यात आला. त्यावेळी या अपघाताची माहिती समोर आली. ही माहिती समोर येताच याठिकाणी सर्वांना मोठा धक्का बसला. मुलीचा भाऊ अशोक दास याने सांगितले की, त्याने वरपक्षाच्या लोकांना खूप विनंती केली की फक्त मुलाला येऊ द्या. लग्न पार पडू द्या. मात्र, या अपघानंतर त्यांनी लग्नासाठी नकार दिला. वऱ्हाडींच्या स्वागतासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. यासाठी 4 लाख रुपये खर्च झाले. मात्र, सर्व पैसे वाया गेले, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
advertisement
6 लोकांचा मृत्यू -
दरम्यान, या दुर्घटनेनंतर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वरपक्षाचा भाऊ, पुतण्या, मित्रासह शेजाऱ्यांचा समावेश आहे. वराने येऊन हा लग्नसोहळा पार पडावा, यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे, असेही वधूच्या भावाने सांगितले. दरम्यान, अपघातानंतर एसएसपी आनंद कुमार यांनी सांगितले की, टीम तयार करण्यात आली आहे. ओव्हरलोड गाडी चालू नये, यासाठी आम्ही रणनिती तयार करत आहोत. तसेच याप्रकरणी कारवाईही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Location :
Bhagalpur,Bihar
First Published :
May 03, 2024 9:23 AM IST
मराठी बातम्या/देश/
वधू पाहत होती वाट, पण वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, 6 जणांचा जागीच मृत्यू, हादरवणारी घटना