सासूसोबत लफडं, प्रायव्हेट Video अन् प्रॉपर्टीचा मॅटर, हादरवणारा कट रचून जावयाचा मर्डर!

Last Updated:

प्रेम, विश्वासघात, ब्लॅकमेलिंग आणि मग हत्या... सासू आणि जावयाच्या अनैतिक संबंधाचा हादरवून टाकणारा शेवट झाला आहे. या हत्याकांडाचा उलगडा करताना पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.

सासूसोबत लफडं, प्रायव्हेट Video अन् प्रॉपर्टीचा मॅटर, हादरवणारा कट रचून जावयाचा मर्डर! (AI Image)
सासूसोबत लफडं, प्रायव्हेट Video अन् प्रॉपर्टीचा मॅटर, हादरवणारा कट रचून जावयाचा मर्डर! (AI Image)
प्रेम, विश्वासघात, ब्लॅकमेलिंग आणि मग हत्या... सासू आणि जावयाच्या अनैतिक संबंधाचा हादरवून टाकणारा शेवट झाला आहे. या हत्याकांडाचा उलगडा करताना पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. 15 वर्षांपूर्वी सरोज नावाच्या महिलेने तिची मुलगी सोनियाचं लग्न सोनू सैनीसोबत केलं. लग्नानंतर सासू मुलगी आणि जावयासह राहायला लागली. पण कालांतराने सासू आणि जावयाचं प्रेम प्रकरण सुरू झालं.
सोनू आणि सरोजमध्ये अनैतिक संबंध होते, हे पोलीस तपासात दिसून आलं. या दोघांनी अश्लिल व्हिडिओही बनवले. मृत जावई सोनूने सरोजच्या नावावर बिजनौरमध्ये एक जमीन खरेदी केली होती, ज्याची किंमत 20 लाख रुपयांची आहे. सोनूला ही जमीन विकायची होती, पण सासू आणि पत्नी याला विरोध करत होते.

व्हिडिओवरून ब्लॅकमेल

प्रॉपर्टीवरून वाद निर्माण झाले तेव्हा सोनूने सासू सरोजला त्यांचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. प्रॉपर्टी विकायला नकार दिला, तर मी तुझा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी सोनूने सरोजला दिली, या धमकीनंतरच हत्येचा कट रचला गेला.
advertisement

हत्येच्या रात्री फुलप्रुफ प्लानिंग

11 ऑक्टोबर 2025 च्या रात्री आई आणि मुलीने भयानक प्लान केला. दोघींनी सोनूला दुधामध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, ज्यामुळे सोनूला गाढ झोप लागली. यानंतर दोघींनी त्याची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह फासावर लटकवला. सोनूने गळपास लावून जीवन संपवल्याचा बनाव दोघांनी रचला.
सकाळी गावामध्ये सोनूने जीवन संपवल्याची अफवा पसरली, यानंतर घाईघाईने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सोनूचा भाऊ मोनू सैनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सोनूची पत्नी सोनियाने आपल्या पतीला त्याचा भाऊ बोलवून घेऊन गेला होता, असं रडत सांगितलं, यावरून मोनूला संशय आला आणि तो थेट पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा या हत्याकांडाचा उलगडा झाला. पोलिसांनी चौकशीसाठी दोघींना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी हत्येची कबुली दिली. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात झालेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement

काय म्हणाले पोलीस?

12 ऑक्टोबर रोजी सोनू सैनी नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली, यानंतर त्याने आयुष्य संपवल्याचा बनाव केला गेला. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून सासू आणि पत्नीला अटक करण्यात आली आहे. सोनूचे त्याच्या सासूसोबत अनैतिक संबंध होते, हे तपासात समोर आलं आहे. मालमत्ता विक्रीवरून ही हत्या झाल्याचं तपासात समोर आलं आहे, अशी माहिती एएसपी प्रवीण सिंग चौहान यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
सासूसोबत लफडं, प्रायव्हेट Video अन् प्रॉपर्टीचा मॅटर, हादरवणारा कट रचून जावयाचा मर्डर!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement