Indian Passport : 3 रंगाचे असतात भारतीय पासपोर्ट, सर्वात पॉवरफूल कोणता, काय आहे या रंगांचा अर्थ?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भारतात बहुतांश नागरिकांना निळा पासपोर्ट जारी केला जातो. हा पासपोर्ट त्या सामान्य नागरिकांसाठी असतो. जे व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कारणांनी विदेशात प्रवास करतात. निळा पासपोर्ट सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर आहे आणि याला आंतरराष्ट्रीय यात्रेसाठी व्यापक रुपाने मान्यता प्राप्त आहे.
उधव कृष्ण, प्रतिनिधी
पाटणा : कुठल्याही परदेशी यात्रेसाठी पासपोर्ट एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. फक्त ओळखपत्र म्हणूनच नव्हे तर याचे रंग हे व्यक्तीची स्थिती आणि भूमिकाही दर्शवतात. भारतात मुख्य रुपाने 3 रंगांचे पासपोर्ट जारी केले जातात. प्रत्येक रंगाचे आपले एक वेगळे महत्त्व आहे.
विभागीय पासपोर्ट ऑफिस पाटणा येथील डिप्टी पासपोर्ट ऑफिसर एम.आर. नाज़मी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पासपोर्ट वापरणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि स्थिती सहज ओळखता येईल यासाठी पासपोर्टचा रंग अर्जदाराची स्थिती आणि आवश्यकतेनुसार ठरवले जातात.
advertisement
पासपोर्टचा रंग फक्त सजावटीसाठी नसतो. तर यावरुन पासपोर्ट धारकाची ओळख, भूमिका आणि पदाला स्पष्ट रूपाने दर्शवले जाते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, पासपोर्टच्या रंगावरुन धारकाला विशेष सुविधा आणि सुरक्षा प्रदान केली जाते.
सामान्य नागरिकांसाठी निळा पासपोर्ट -
एमआर नाजमी म्हणाले की, भारतात बहुतांश नागरिकांना निळा पासपोर्ट जारी केला जातो. हा पासपोर्ट त्या सामान्य नागरिकांसाठी असतो. जे व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कारणांनी विदेशात प्रवास करतात. निळा पासपोर्ट सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर आहे आणि याला आंतरराष्ट्रीय यात्रेसाठी व्यापक रुपाने मान्यता प्राप्त आहे.
advertisement
पांढरा म्हणजे ऑफिशियल पासपोर्ट -
एमआर नाजमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे सरकारी कामांसाठी विदेशात प्रवासाला जातात, जे सरकारी शिष्टमंडळाचा भाग असतात, त्या सरकारी अधिकाऱ्यांना मुख्यत: हा पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. पांढरा पासपोर्ट सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका आणि अधिकार दर्शवतो.
advertisement
रेड किंवा मरुन पासपोर्ट -
भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांना लाल किंवा मरून पासपोर्ट दिला जातो. हा पासपोर्ट राजदूतांना, उच्चायुक्तांना आणि इतर वरिष्ठ राजनैतिक पदांवर असलेल्या व्यक्तींना दिला जातोआंतरराष्ट्रीय संबंधांना मजबूत करण्यासाठी आणि राजनैतिक जबाबदाऱ्या पूर्ण . या पासपोर्टचा वापर हा करण्यासाठी केला जातो, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
जालन्याच्या मोसंबीची उत्तर भारतीयांना आवडली, दररोज होतेय 200 ते 500 टन निर्यात, दर किती माहितीये का?
तुम्हाला कोणता पासपोर्ट मिळणार?
डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर नाजमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही एक सामान्य नागरिक असाल तर तुम्हाला निळा पासपोर्ट मिळेल. जर तुम्ही सरकारी सेवेत असाल आणि सरकारी कामासाठी विदेशात प्रवासाला जात असाल तर तुम्हाला पांढरा पासपोर्ट मिळेल. तुम्ही डिप्लोमॅटिक पदावर काम करत असाल तर तुम्हाला मरून पासपोर्ट दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
Location :
Patna,Bihar
First Published :
August 26, 2024 8:08 PM IST
मराठी बातम्या/देश/
Indian Passport : 3 रंगाचे असतात भारतीय पासपोर्ट, सर्वात पॉवरफूल कोणता, काय आहे या रंगांचा अर्थ?