गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडला, 3 जण हवेत उडाले; एका क्षणात कोसळले भीषण संकट, देणारा धक्का अपघात

Last Updated:

Accident News: छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये इनोव्हा चालकाच्या गाफीलपणामुळे भीषण अपघात झाला. गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडल्याने गाडी उलटली आणि एका व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

News18
News18
रायपूर: छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. या अपघातात एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुण व्यापार्‍याचा जीव गेला आणि दोन कुटुंबांवर संकट कोसळले. अपघातात एका कापड व्यापार्‍याचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रायपूर-बिलासपूर महामार्गावर झाला. इनोवा गाडी चालवणाऱ्या तरुणाने गुटखा थुंकण्यासाठी गाडीचा दरवाजा अचानक उघडला. गाडीचा वेग 100 किमी/तासापेक्षा अधिक होता आणि दरवाजा उघडताच चालकाचा नियंत्रण सुटल्याने इनोवा उलटली.
अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव जैकी गेही (वय 31) असून ते चकरभाटा भागातील कापड व्यापारी होते. त्याचा मित्राने – आकाश चंदानी – इनोवा चालवत होता. त्याच्यासोबत पंकज छाबडा पुढील सीटवर तर जैकी मागच्या सीटवर होते. रात्री 1.30 च्या सुमारास गाडी रायपूरकडे निघाली असताना आकाशने अचानक गुटखा थुंकण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडी डिव्हायडरवर आदळून अनेक वेळा उलटली.
advertisement
सूर्याने IPLच्या पराभवाचा राग ठाण्यावर काढला, धू धू धुतले; 27 चेंडूत धावांचा...
अपघातात तिघेही गाडीतून बाहेर फेकले गेले. जैकी गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावले. त्यांच्या छाती, डोक्याला आणि खांद्याला जबर मार लागला होता. आकाश व पंकजही गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही इनोवा गाडी केवळ पलटलीच नाही तर एक उभी असलेली व्यावसायिक गाडी आणि नंतर अर्टिगा कारवर आदळली. या अपघातात अर्टिगाचा चालकही जखमी झाला. आपत्कालीन सेवा पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर सील केला व जखमींना रुग्णालयात हलवले.
मराठी बातम्या/देश/
गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडला, 3 जण हवेत उडाले; एका क्षणात कोसळले भीषण संकट, देणारा धक्का अपघात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement