सूर्याचा रौद्र अवतार, IPLच्या पराभवाचा राग ठाण्यावर काढला, धू धू धुतले; 27 चेंडूत केला धावांचा स्फोट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Surya Kumar Yadav: IPL 2025 हंगामातील MVP सूर्यकुमार यादवने T20 मुंबई लीगमध्ये जबरदस्त पुनरागमन करत ईगल ठाणे स्ट्रायकर्सविरुद्ध अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक झळकावले. IPLमधील अपयश पचवून सूर्यानं दमदार फटकेबाजी करत पुन्हा एकदा आपल्या फॉर्मची झलक दाखवली.
Surya Kumar Yadavनवी मुंबई: नुक्त्याच झालेल्या आयपीएल 2025च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला MVP (Most Valuable Player)चा पुरस्कार देण्यात आला. संपूर्ण हंगामात सूर्याने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अनेक सामन्यांचे पारडे फिरवले. असे असेल तरी सूर्याची खेळी मुंबई संघाला विजेतेपद मिळून देऊ शकली नाही. मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे आयपीएलचे विजेतेपद आरसीबीने पटकावले. आयपीएल संपताच सूर्यकुमार यादव टी-20 मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी मैदानात उतरला. या स्पर्धेत सूर्या ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून खेळतोय. आज बुधवारी झालेल्या सामन्यात ईगल ठाणे स्ट्रायकर्स विरुद्ध सूर्याने आयपीएलमधील अपयशाचा राग काढला.
कोण CPR देतोय, कोण Ambulance नाही म्हणून उचलून पळतोय; चेंगराचेंगरीची भयावह घटना
ईगल ठाणे स्ट्रायकर्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सूर्याने वादळी खेळी केली. सूर्याने फक्त 27 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट 185.19 इतका होता. सूर्याने या मॅचमध्ये गोलंदाजांची बेदम धुलाई केली.
advertisement
या सामन्यात ट्रायम्फ नाईट्सकडून जिगर सुरेंद्र राणाने 42 चेंडूत 53 धावा केल्या. सूर्याच्या आक्रमक खेळीमुळे ट्रायम्फ नाईट्सने 20 षटकात 7 बाद 179 धावा उभ्या केल्या.
हा फोटो पाहून विराट देखील रडेल, दिव्यांशीसाठी आई-वडिलांची आर्त हाक
IPL 2025मध्ये सूर्याने 16 सान्यात 167.92च्या स्ट्राईक रेटने 717 धावा केल्या. नाबाद 73 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने या हंगामात 69 चौकार आणि तब्बल 38 षटकार मारले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 9:32 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सूर्याचा रौद्र अवतार, IPLच्या पराभवाचा राग ठाण्यावर काढला, धू धू धुतले; 27 चेंडूत केला धावांचा स्फोट