हा फोटो पाहून विराट देखील रडेल, 14 वर्षाच्या दिव्यांशीसाठी आई-वडिलांची आर्त हाक- तुम्ही माझी मुलगी पाहिली आहे का?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Bangalore Stampede: RCBच्या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात गर्दीमुळे अनेकांचे जीव गेला. या चेंगराचेंगरीत 14 वर्षांच्या दिव्यांशी नावाच्या मुलीचा शोध अद्याप लागलेला नाही. दिव्यांशी कुठे आहे? जिवंत, की...? हा प्रश्न सध्या संपूर्ण बेंगळुरू शहराला अस्वस्थ करत आहे.
बेंगळुरू: बुधवार चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर RCBच्या विक्ट्री परेडसाठी जमलेल्या लाखोंच्या गर्दीत एकच आर्त प्रश्न ऐकू येत होता-"तुम्ही माझी मुलगी पाहिली आहे का?" हातात मोबाईलची स्क्रीन त्यावर एका 14 वर्षांच्या मुलीचा गोड हसरा फोटो. पिवळ्या पोशाखात, केसांत गजरा, कानात झुमके आणि चेहऱ्यावर निरागसतेची चमक – तिचं नाव होतं दिव्यांशी. पण आता तीच दिव्यांशी RCB च्या विजयाच्या जल्लोषात कुठेतरी हरवली आहे.
RCB ने अखेर IPL ची पहिली ट्रॉफी जिंकली आणि शहरभर आनंदोत्सव सुरू झाला. लाखो लोक स्टेडियमच्या आजूबाजूला जमले होते. दिव्यांशीसाठी हा एक स्वप्नवत क्षण होता. विराट कोहलीला प्रत्यक्ष पाहण्याची तिची इच्छा होती. पण त्या प्रचंड गर्दीत ती आपल्या आई-वडिलांपासून दूर झाली… आणि नंतर परत दिसलीच नाही.
advertisement
गेटवर गर्दीचा उद्रेक, दिव्यांशी हरवते
स्टेडियमबाहेर जवळपास 6 लाखांची गर्दी जमली होती, जिथे प्रशासनाने केवळ 2 लाखांची व्यवस्था केली होती. अनेक गेट्स असतानाही संपूर्ण गर्दी एका गेटवर तुटून पडली. काही लोक भिंती फोडून, काही सुरक्षा कुंपण ओलांडून आत शिरायचा प्रयत्न करत होते. याच गोंधळात भगदड उडाली आणि याच गर्दीत दिव्यांशी हरवली.
advertisement
रुग्णालय, पोलीस ठाणे, मोर्चरी… पण कुठेच दिव्यांशी नाही
दिवसभर तिचे पालक फक्त एकच प्रश्न घेऊन धावत होते – “तुम्ही माझी दिव्यांशी पाहिली आहे का?”
ते बॉवरिंग रुग्णालयात गेले, जिथे जखमींवर उपचार सुरू होते. नंतर विक्टोरिया हॉस्पिटल, पोलीस ठाणे, अगदी मोर्चरीपर्यंत… पण कुठेच दिव्यांशीचं काहीच ठावठिकाणा नाही. तिच्या आईने डोळ्यांत अश्रू घेऊन सांगितलं – ती खूप खुश होती. विराटला बघायचं स्वप्न होतं तिला. आता एकदाच ती सापडावी, इतकंच मागणं आहे देवाजवळ.
advertisement
एक फोटो, जो आता...
दिव्यांशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हजारो लोक तिचा शोध घेत आहेत. पण वेळ निघून जातोय आणि आशा मंदावत चालली आहे. RCB चाहत्यांसाठी ही ट्रॉफी आणि हा दिवस कधीच विसरता येणार नाही. पण दिव्यांशीच्या पालकांसाठी हा दिवस बनलाय एक अधुरी, हृदयविदारक कहाणी.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 7:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हा फोटो पाहून विराट देखील रडेल, 14 वर्षाच्या दिव्यांशीसाठी आई-वडिलांची आर्त हाक- तुम्ही माझी मुलगी पाहिली आहे का?