कोण CPR देतोय, कोण Ambulance नाही म्हणून उचलून पळतोय; चेंगराचेंगरीची भयावह घटना, कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी Video पाहू नका
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Stampede: आरसीबीच्या आयपीएल विजयानंतर बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू, 25 जखमी. विजय रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
बेंगळुरू: आपल्या पहिल्या आयपीएल विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ अहमदाबादवरून त्यांच्या होम टाऊन म्हणजेच बेंगळुरू शहरात दाखल झाला. तब्बल 18 वर्षानंतर आयपीएलचे विजेतेपद मिळवल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी काल रात्रीपासून मोठा जल्लोष करण्यास सुरूवात केली होती.
आज संघ शहरात दाखल झाल्यावर या उत्साहात आणखी भर पडली. दरम्यान बेंगळुरू शहर पोलिसांनी एवढ्या गर्दीला नियंत्रित करता येणार नाही असे सांगत विजयाची रॅलीला परवानगी नाकारली. मात्र संघाचे घरचे मैदान असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचे स्वागत होणार होते. त्याआधी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला तर 8 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
SHOCKING 😳
Stampede at #ChinaswamyStadium,
Three people are feared dead and at least 10 others injured after a crowd of fans gathered outside #Bengaluru’s M. Chinnaswamy Stadium to celebrate #RCB’s victory in the 2025 #IPL championship. pic.twitter.com/UYVFMohykT
— Mahua Moitra Fans (@MahuaMoitraFans) June 4, 2025
advertisement
चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर इतकी गर्दी झाली होती की त्याचे नियंत्रण करणे अशक्य होते. अशात मैदानाच्या आत जाण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आणि अशात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत महिलांसह काही चाहत्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मैदानाबाहेरचे व्हिडिओ भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
Bad News ❌
7 Diedd after stampede outside #chinnaswamystadium.
25 injured & Many critical.
People gathered for Victoryparade of #RCB.
Pray for the victims...🙏#IPL2025Final #RCBvPBKS #ViratKohli
घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाल्याने बेशुद्ध पडलेल्या लोकांवर तेथचे प्रथमिक उपचार दिले जात होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे Ambulance उपलब्ध नसल्याने लोकांनी बेशुद्ध झालेल्या लोकांना उचलून रुग्णालयात नेले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 5:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कोण CPR देतोय, कोण Ambulance नाही म्हणून उचलून पळतोय; चेंगराचेंगरीची भयावह घटना, कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी Video पाहू नका