Science : टूटता तारा, धूमकेतू आणि क्षुद्रग्रह; आकाशात पाहिला असेल पण फार कमी लोकांना माहित असेल यांच्यातील फरक

Last Updated:

विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीला एक वेगळी व्याख्या आहे. त्यामुळे आज आपण सोप्या भाषेत धूमकेतू (Comet), क्षुद्रग्रह (Asteroid) आणि उल्कापिंड (Meteor) यांच्यातला फरक समजून घेऊया.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आकाशाकडे बघताना आपल्याला अनेकदा चमकणारे तारे, उल्का किंवा धुमकेतू दिसतात ज्यांना मागे शेपूट असते. शाळेत असताना आपण "टूटता तारा", "धूमकेतू" किंवा "क्षुद्रग्रह" याबद्दल ऐकलं असेल. पण हे सगळे शब्द अनेकांना एकसारखेच वाटतात. पण असं असलं तरी देखील विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीला एक वेगळी व्याख्या आहे. त्यामुळे आज आपण सोप्या भाषेत धूमकेतू (Comet), क्षुद्रग्रह (Asteroid) आणि उल्कापिंड (Meteor) यांच्यातला फरक समजून घेऊया.
क्षुद्रग्रह (Asteroid)
क्षुद्रग्रह म्हणजे सौरमालेच्या निर्मितीच्या काळात उरलेल्या प्रचंड खडकाळ दगडं. ही प्रामुख्याने मंगळ आणि गुरू ग्रहाच्या मधल्या पट्ट्यात आढळतात. त्यांचा अभ्यास करण्यासाठी नासाने "बेन्नू" (Bennu) नावाच्या एका प्रसिद्ध क्षुद्रग्रहावर OSIRIS-REx मोहिम राबवली होती. त्यातून समजलं की हे खडकाळ असतात, चमकत नाहीत आणि त्यावर बर्फ नसतो.
धूमकेतू (Comet)
धूमकेतू म्हणजे खडकांबरोबरच बर्फाचे मोठे गोळे. हे जेव्हा सूर्याजवळ पोहोचतात तेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातून धूळ आणि वायू बाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्या मागे एक चमकणारी रेषा किंवा "शेपूट" दिसते. हा त्यांचा खास गुणधर्म आहे. "हॅलीचा धूमकेतू" (Halley’s Comet) हा सर्वात प्रसिद्ध धूमकेतू मानला जातो.
advertisement
उल्कापिंड (Meteor)
उल्कापिंड म्हणजे अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने आलेली लहान दगडं किंवा धुळीचे कण असतात. हे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना जळून प्रकाशमान होतात आणि त्यांना आपण "टूटता तारा" म्हणतो. मात्र बहुतांश वेळा हे पूर्ण जळून जातात आणि जमिनीवर पोहोचत नाहीत.
थोडक्यात सांगायचं झालं तर, क्षुद्रग्रह म्हणजे खडकाळ वस्तू, धूमकेतू म्हणजे बर्फ + खडकाचे गोळे तर उल्कापिंड म्हणजे लहान तुकडे जे वातावरणात जळून चमकतात.
advertisement
आता तरी तुम्हाला यांच्यामधील फरक नक्कीच लक्षात आला असेल. मग आता तुमच्या मित्रांनाही असा प्रश्न विचारा आणि त्यांना याबद्दल सांगून मित्रांसमोर फ्लेक्स करा.
मराठी बातम्या/Viral/
Science : टूटता तारा, धूमकेतू आणि क्षुद्रग्रह; आकाशात पाहिला असेल पण फार कमी लोकांना माहित असेल यांच्यातील फरक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement