Palmistry: लव्ह मॅरेज होत नाही! झालंच तर कहाणीचा शेवट खूपच वाईट होतो; हातावरील 1 रेषा सांगते...

Last Updated:

Palmistry: विवाह रेषा हातावर करंगळीच्या खाली आणि हृदय रेषेच्या वर असलेल्या भागावर असते. हा भाग बुध पर्वताचा (Mount of Mercury) असतो. काही लोकांच्या हातावर एकच विवाह रेषा असते, तर काहींच्या हातावर एकापेक्षा जास्त रेषा असू शकतात.

News18
News18
मुंबई : हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, हातावरील रेषा आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना आणि भविष्याविषयी माहिती देतात. त्यापैकीच एक महत्त्वाची रेषा म्हणजे विवाह रेषा. ही रेषा व्यक्तीच्या वैवाहिक जीवनाविषयी, प्रेमसंबंधांविषयी आणि नात्यांमधील स्थिरता व यशाविषयी माहिती देते. ही रेषा किती स्पष्ट आणि ठळक आहे, यावर वैवाहिक जीवनाची स्थिती अवलंबून असते, असे मानले जाते.
विवाह रेषा कुठे असते?
विवाह रेषा हातावर करंगळीच्या खाली आणि हृदय रेषेच्या वर असलेल्या भागावर असते. हा भाग बुध पर्वताचा (Mount of Mercury) असतो. काही लोकांच्या हातावर एकच विवाह रेषा असते, तर काहींच्या हातावर एकापेक्षा जास्त रेषा असू शकतात. या रेषा जितक्या स्पष्ट आणि गडद असतील, तितके त्यांचे वैवाहिक जीवन अधिक स्थिर आणि यशस्वी असते, असे मानले जाते. याच्या उलट स्थिती जर ही रेषा धुसर आणि तुटलेली असेल तर होते.
advertisement
विवाह रेषा कशी असावी?
विवाह रेषा शुभ मानण्यासाठी काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. विवाह रेषा स्पष्ट आणि गडद असावी. अशी रेषा मजबूत आणि स्थिर नातेसंबंध दर्शवते. रेषा सरळ आणि अखंड असावी. तुटलेली, दुभंगलेली किंवा अर्धवट रेषा वैवाहिक जीवनात अडचणी किंवा नात्यात दुरावा दर्शवते. हातावर एकच स्पष्ट आणि गडद विवाह रेषा असणे अतिशय शुभ मानले जाते. ही रेषा एकनिष्ठ आणि सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे.
advertisement
जर विवाह रेषा हृदय रेषेच्या अगदी जवळ असेल, तर असे मानले जाते की त्या व्यक्तीचे लग्न लवकर होते. ज दोन विवाह रेषा असतील आणि त्या दोन्ही समान लांबीच्या असतील, तर असे मानले जाते की व्यक्तीचे दोनदा लग्न होऊ शकते. जर विवाह रेषेच्या शेवटी त्रिशूळासारखे चिन्ह असेल, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. असे लोक वैवाहिक जीवनात खूप आनंदी आणि समाधानी असतात.
advertisement
खंडित विवाह रेषेचा अर्थ - लग्न रेषा मध्यभागी तुटलेली असेल किंवा ती अस्पष्ट दिसत असेल तर ती शुभ मानली जात नाही. हस्तरेषाशास्त्रानुसार, अशी रेषा दर्शवते की प्रेम जीवनात अनेक अडचणी येतील. ज्या लोकांची विवाह रेषा तुटलेली आहे त्यांना वारंवार नातेसंबंधांमध्ये विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो. प्रेम विवाहाची शक्यता खूप कमी असते आणि जरी नाते तयार झाले तरी त्याचा शेवट अनेकदा त्रासदायक असतो. नात्यांमध्ये गैरसमज आणि अस्थिरता देखील वारंवार दिसून येते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Palmistry: लव्ह मॅरेज होत नाही! झालंच तर कहाणीचा शेवट खूपच वाईट होतो; हातावरील 1 रेषा सांगते...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement