advertisement

Accident News : हायवेवर अनियंत्रित झालेला ट्रक दुकानांमध्ये घुसला; तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर

Last Updated:

वेगाने कानपूरच्या दिशेने जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला. रस्त्याकडेला असलेल्या दुकानांमध्ये हा ट्रक घुसला.

News18
News18
कानपूर, 17 डिसेंबर : कानपूर आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री दगड वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. अचानक नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक रस्त्याकडेला असलेल्या चहा आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये घुसला. या अपघातात चहावाल्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माणिकपूर वळणावर नेहमीच गर्दी असते. वेगाने कानपूरच्या दिशेने जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला. रस्त्याकडेला असलेल्या दुकानांमध्ये हा ट्रक घुसला. यानंतर मोठा गोंधळ उडाला. गोंधळात लोक इकडे तिकडे जिवाच्या आकांताने धावत होते.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच एसएसपी संजय वर्मा, डीएम अवनीश राय, सीओ सिटी पोलीस फोर्ससह घटनास्थळी पोहोचले. महामार्गाकडेला असलेल्या चहा दुकानातील २६ वर्षीय कुलदीपसह आणखी दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात घटनास्थळी चार जण अडकले होते. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये एकाचे वय १५ वर्षे असून त्याचं नाव राहुल असल्याची माहिती समजते. तर दुसऱ्याचे नाव तालिब इकदिल असं आहे. घटनेनंतर चालक ट्रक सोडून फरार झाला आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे. आता चालक आणि ट्रक मालकाचा शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Accident News : हायवेवर अनियंत्रित झालेला ट्रक दुकानांमध्ये घुसला; तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement