G20 Summit : भारताच्या G20 अध्यक्षपदाचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलं कौतुक, म्हणाले..

Last Updated:

व्हिडिओमध्ये बायडेन यांनी म्हटलंय की, 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. हे या G20 शिखर परिषदेचे लक्ष्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : G20 शिखर परिषद 2023 दरम्यान संपूर्ण जग भारताची ताकद पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व देशांना 'दिल्ली घोषणापत्रा'च्या माध्यमातून एका व्यासपीठावर आणण्यात यशस्वी ठरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे जगातील महागाई आणि रोजगार यांसारख्या समस्यांमुळे चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक समस्या सोडवण्यासाठी भारताच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. जर आपण उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक केली तर सर्वांनाच फायदा होईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले.
जो बायडेन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरुन G20 मध्ये आपल्या भाषणाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, 'ज्या वेळी जागतिक अर्थव्यवस्था हवामान संकट, नाजूकता आणि संघर्षाच्या अतिव्यापी धक्क्यांमुळे त्रस्त आहे. पण G20 अजूनही आमच्या सर्वात महत्त्वाच्या समस्या सोडवू शकतो, हे या वर्षीच्या शिखर परिषदेने सिद्ध केले आहे.'
advertisement
व्हिडिओमध्ये बायडेन यांनी म्हटलंय की, 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. हे या G20 शिखर परिषदेचे लक्ष्य आहे. या भागीदारीबद्दल आज आम्ही बोलत आहोत. आम्ही प्रादेशिक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर अनेक देशांमध्ये आणि अनेक प्रदेशांमध्ये काम करत आहोत. आम्ही जहाजे आणि रेल्वेमध्ये गुंतवणूक करणार आहोत, जे भारत आणि युरोपला जोडतील. तसेच यामुळे भरपूर संधी निर्माण होतील. महागाईच्या मुद्द्यावरही जग एकत्र आहे. आम्ही येथे जे निर्णय घेऊ, ते पुढील अनेक दशकांच्या आमच्या भविष्यावर परिणाम करतील.
advertisement
बायडन पुढे म्हणाले की, 'चला, एकत्र मिळून आपण यावर काम करावे आणि यावर गुंतवणूक करावी. जेव्हा आपण वाढत्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करू तेव्हा सर्व अर्थव्यवस्थांना फायदा होईल. जेव्हा आपण भविष्यात आणि लोकांमध्ये गुंतवणूक करू, तेव्हा सगळीकडे लोकांना त्याचा फायदा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी दिल्ली घोषणापत्र सर्व देशांना पटवून देण्यात यशस्वी ठरले. जगावर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करता यावा, यासाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त करत अमेरिका आणि रशिया-चीन या दोन्ही गटांनी भारताशी सहमती दर्शवली.
view comments
मराठी बातम्या/देश/
G20 Summit : भारताच्या G20 अध्यक्षपदाचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलं कौतुक, म्हणाले..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement