Kheerganga Landslide: आधी ढगफुटी, नंतर खीरगंगा नदीचं रौद्ररूप, हॉटेल आणि घरं वाहून गेली

Last Updated:

उत्तरकाशी: उत्तराखंडमध्ये अति मुसळधार पावसामुळे धराली गाव ढगफुटी आणि दरड कोसळल्याने वाहून गेलं आहे. संपूर्ण राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली असल्याची भीती आहे.

News18
News18
उत्तरकाशी: उत्तराखंडमध्ये अति मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. मागच्या 24 तासांत मोठं नुकसान झालं असताना पुन्हा एकदा संकट कोसळलं आहे. ढगफुटी आणि दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहे. उत्तकाशीतील धराली गाव या ढगफुटी सदृश्यं पावसात आणि दरड कोसळल्याने वाहून गेलं आहे.
advertisement
ही घटना इतकी भयंकर आहे की, अख्ख गावच्या गावं जमीनदोस्त झालं. इमारती वाहून गेल्या, अनेक लोक ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 50-60 हॉटेल्स वाहून गेले आहेत.
गावंच्या गाव उद्ध्वस्त झालं आहे. हे गाव डोंगरांच्या खाली असल्याने मोठा फटका बसला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 60 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच, तातडीनं आपत्कालीन विभाग घटनास्थळी पोहोचला असून बचावकार्य सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Kheerganga Landslide: आधी ढगफुटी, नंतर खीरगंगा नदीचं रौद्ररूप, हॉटेल आणि घरं वाहून गेली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement