Uttarkashi Cloudburst Video: उत्तरकाशीमध्ये आभाळ फाटलं, गंगोत्री मार्गावर 50 हॉटेल वाहून गेले; धडकी भरवणारे पाच Video

Last Updated:

Uttarkashi Cloudburst Video: उत्तरकाशीमध्ये पुरामुळे जवळपास 50  हॉटेल्स आणि होमस्टे उद्ध्वस्त झाले आहेत.

News18
News18
नवी दिल्ली :  उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. खीर गंगा नदीला मोठा पूर आल्याने थरली गाव ढिगाऱ्खाली गेले आहे. या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे आपत्ती पथके तातडीने दाखल झाले आहे.  या विध्वंसाचे व्हिडीओ समोर आले आहे.
गंगोत्री धामला जाताना मुख्य थांबा असलेल्या धराली येथील खीर गंगा नदीला पूर आला आहे. पुरामुळे जवळपास 50  हॉटेल्स आणि होमस्टे उद्ध्वस्त झाले आहेत. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 10 ते 12 कामगार अडकल्याची भीती आहे. प्रत्यक्षदर्शी राजेश पनवा यांनी सांगितले की, खीर गंगेच्या पाणलोट क्षेत्रात कुठेतरी ढग फुटला आहे, ज्यामुळे हा विनाशकारी पूर आला आहे. पुरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
advertisement
advertisement
पुरामुळे धाराली बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. पुरामुळे खीर गंगेच्या काठावर असलेले प्राचीन कल्प केदार मंदिरही ढिगाऱ्याखाली गेल्याचे वृत्त आहे.
advertisement
या दुर्देवी घटनेची माहिती समजताच SDRF, स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य वेगात सुरू आहे.

अमित शहांचा फोन

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. धराली गावामध्ये झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Uttarkashi Cloudburst Video: उत्तरकाशीमध्ये आभाळ फाटलं, गंगोत्री मार्गावर 50 हॉटेल वाहून गेले; धडकी भरवणारे पाच Video
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement