तेव्हा आपण एक राहिलो नाही...; पानिपत शौर्यभूमीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Last Updated:

Devendra Fadnavis At Panipat: पानिपतचे युद्ध हे देशाच्या आणि मराठ्याच्या इतिहासातील जखम असली तरी ती शौर्याची गाथा आहे. या वीरभूमीवर मराठे ज्या परिस्थितीत लढले त्याला तोड नाही असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

News18
News18
पानिपत (हरियाणा): पानिपतच्या शौर्य भूमीला वंदन करण्याची जेव्हा संधी मिळेल तेव्हे मी इथे येत राहीन. या शौर्य भूमीच्या ट्रस्टचे मनापासून आभार मानले त्यांनी आमचा इतिहास जिवंत ठेवला, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले.
पानिपत ही युद्ध नव्हे पावन भूमी आहे. तेव्हा जर मराठ्यांच्या मदतीला देशातील अन्य राजे आले असते तर अब्दालीचा पराभव झाला असता. तेव्हा अब्दाला जिंकला असला तरी मनाने असा पराभूत झाला की पुन्हा भारताकडे आला नाही. पण मला असे वाटते की तेव्हा ही आपण एक असतो तर सेफ असतो. पानिपत युद्धात आपण एक नव्हतो त्यामुळे सेफ राहिले नाही. त्यामुळेच आपल्यावर अनेकांनी राज्य केले असे फडणवीस म्हणाले.
advertisement
बजेटसाठी थेट मोदींनी घेतली बैठक, करदात्यांना मिळणार गिफ्ट; स्लॅब होणार मोठे बदल
पानिपतच्या युद्धातून हेच शिकले पाहिजे की- जाती, प्रांत, भाषेचे भेद विसरून एकत्र आले पाहिजे. देशाचा शत्रू कोण हे समजून घेऊन जर एकत्रपणे पुढे गेलो तर पंतप्रधान मोदींनी विकसीत भारताचा जो नारा दिला आहे, ते स्वप्न आपण पूर्ण करू शकू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
advertisement
पानिपत येथे स्मारकासाठी राज्य सरकार पैसे देऊन जागा विकत घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक देखील झाले पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/देश/
तेव्हा आपण एक राहिलो नाही...; पानिपत शौर्यभूमीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केली मोठी घोषणा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement