Pakistan Fatah-1: पाकिस्तानने दिल्लीवर टाकलेली फतेह-1 मिसाईल किती घातक आहे? वैशिष्ट्ये काय आहेत?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pakistan Fateh 1 Missile: सीमाभागात गोळीबार आणि ड्रोन हल्ले केल्यानंतर आणि भारताने तितकेच जोरदार उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने राजधानी नवी दिल्लीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या धुमश्चक्रीदरम्यान शनिवारी पाकिस्तानने थेट राजधानी दिल्लीच्या दिशेने फतेह-1 क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय वायुसेनेच्या जवानांनी पाकिस्तानचा हल्ला काही क्षणांत परतावून लावला. भारताने पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ले केल्यानंतर शनिवारी पहाटे पाकिस्तानने राजधानी नवी दिल्लीला लक्ष्य केले. परंतु हरियाणाच्या शिरसा भागांतच फतेह-1 क्षेपणास्त्राचा हल्ला भारतीय वायु दलाने परतावून लावला. फतेह-१ क्षेपणास्त्राचे तुकडे शिरसा भागात सापडले आहेत.
पाकिस्तानने शुक्रवारी संध्याकाळपासून जम्मूसह अनेक ठिकाणी पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले होते, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती. काल संध्याकाळनंतर परिस्थिती हळूहळू बिकट होऊ लागली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की पश्चिम आणि उत्तर सीमेवरील शहरांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून लष्करी सुविधा आणि नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, जो भारताने हाणून पाडला आहे.
advertisement
पाकिस्तानची फतेह-1 किती घातक? वैशिष्ट्ये काय आहेत?
फतेह-1 ही पाकिस्तानने चीनच्या मदतीने विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची पहिली अधिकृत चाचणी डिसेंबर २०२१ मध्ये पाकिस्तानच्या सैन्याने घेतली होती. फताह-I हे क्षेपणास्त्र विकसित मानले जाते, ज्यामध्ये विस्तारित श्रेणी आणि चांगली अचूकता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेह-१ हे कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे काम करते आणि १५० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे , ज्यामुळे जवळच्या धोक्यांविरुद्ध जलद प्रतिसाद देण्याची क्षमता मिळते. फताह-१ हे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने विकसित केलेले आणि जून २०२३ मध्ये अनावरण केलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे इराणचे पहिले हायपरसोनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. इराणच्या मते, त्याची उच्च गतिशीलता आणि वेग क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींपासून वाचण्यास मदत करते.
advertisement
पाकिस्तानच्या फतेह-1 क्षेपणास्त्रला भारताने 'जागा' दाखवली
ताज्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने भारताविरुद्ध क्षेपणास्त्र फतेह-१ वापरले, जे भारताने पाडले. फतेह-१ ही एक पाकिस्तानी गाईडेड मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम (एमएलआरएस) आहे, जी जमिनीवरून मारा करण्यास सक्षम आहे. त्याची मारा करण्याची क्षमता सुमारे १४० किमी आहे आणि ती अण्वस्त्रे आणि पारंपारिक शस्त्रांनी सज्ज असू शकते. हे क्षेपणास्त्र चिनी तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केले गेले आहे आणि लक्ष्यांवर जलद आणि अचूक हल्ले करण्यासाठी डिझाइन केले आहे. पण भारतावरील पाकिस्तानचा हा हल्ला अयशस्वी झाला आहे. फतेह-1 क्षेपणास्त्र हे पाकिस्तानच्या 'फुल स्पेक्ट्रम डिटरन्स' धोरणाचा भाग मानले जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 8:19 AM IST
मराठी बातम्या/देश/
Pakistan Fatah-1: पाकिस्तानने दिल्लीवर टाकलेली फतेह-1 मिसाईल किती घातक आहे? वैशिष्ट्ये काय आहेत?