UP Politics : उत्तर प्रदेशात भाजपची जादू ओसरण्याला योगी आदित्यनाथ जबाबदार? काय आहे Inside Story?

Last Updated:

UP Politics : उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला मिळालेल्या आघाडीमुळे भाजपला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ
मुंबई : नुकतीच देशात लोकसभा निवडणूक पार पडली. काल (4 जून) मतमोजणी झाली. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपची जादू ओसरल्याचं दिसत आहे. समाजवादी पक्षाने भाजपला मागे टाकलं आहे. भाजपला 33 जागा मिळाल्या आहेत, तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला मिळून 43 जागा मिळाल्या आहेत. अखिलेश यादव यांचं मुस्लिम-यादव, मागास- दलित हे समीकरण चाललं. भाजपला आपल्या कोअर मतदारांची मतंसुद्धा मिळाली नसल्याची चर्चा आहे. त्यामध्ये राजपूत मतदार सर्वांत जास्त महत्त्वाचे होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भविष्यवाणीचाही परिणाम झाल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांदरम्यान केजरीवाल म्हणाले होते, की भाजप पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं जाईल. भाजपने मध्य प्रदेशातून शिवराजसिंह चौहान यांना अशाच प्रकारे हटवलं होतं. उत्तर प्रदेशात भाजपच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या अनेक घटकांबाबत चर्चा सुरू आहे. त्यापैकी योगी फॅक्टर हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
राजस्थानपासून उत्तर प्रदेशपर्यंत भाजपच्या पराभवासाठी राजपूत मतदारांची नाराजी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. अशाच काही कारणांमुळे सोशल मीडियावर जोक्स आणि मीम्सचा पाऊस पडत आहे. या निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जबाबदार असल्याचं यातून दाखवलं जात आहे. या मीम्समध्ये निवडणुकीत पराभूत झालेल्या साध्वी निरंजन ज्योती आणि अत्यंत कमी मतांनी विजयी झालेले साक्षी महाराज यांच्या वक्तव्यांचाही वापर केला जात आहे.
advertisement
योगी फॅक्टर
सध्याच्या भाजपमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कमी लेखता येणार नाही. भाजपच्या निवडणूक प्रचारात उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्यानंतर योगींची सर्वाधिक मागणी होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी 206 रॅली आणि सभा घेतल्या, तर योगी आदित्यनाथ यांनी 204 रॅली आणि सभा घेतल्या.
अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी योगी आदित्यनाथ यांच्या सभेची मागणी करणारी पत्रं लिहिली होती. पक्षाचे पोस्टर बॉय बनलेले हिंदुहृदयसम्राट योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता आणि पक्षाप्रति असलेली त्यांची निष्ठा उल्लेखनीय आहे. देशातल्या अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची कार्यशैली अवलंबली आहे. भाजपच्या विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्येसुद्धा कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी 'बुलडोझर बाबा'चं (योगी आदित्यनाथ) उदाहरण दिलं जातं. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे योगींची चर्चा होते. 2019ची लोकसभा निवडणूक आणि 2022च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेची हमी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनीदेखील उत्तर प्रदेशातली कायदा-सुव्यवस्था आणि विकासाबद्दल योगींचं कौतुक केलं होतं.
advertisement
उत्तर प्रदेशात योगींचं महत्त्व
योगी आदित्यनाथ यांचा पक्ष असलेल्या हिंदू युवा वाहिनीने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात भाजपच्या तोडीस तोड काम केलेलं आहे. हा पक्ष आता विसर्जित झाला आहे. दोन दशकांपूर्वीपर्यंत योगी घोडेस्वाराच्या चिन्हावर निवडणूक लढवत होते. योगींच्या आधी गोरखनाथ मठाचे महंत अवैद्यनाथ संसदेची निवडणूक लढवत होते आणि योगी विधानसभेची निवडणूक लढवत होते. गोरखपूरच्या आसपासच्या भागात भाजपने मठाच्या आवडीचा उमेदवार उभा केला नसता, तर भाजपला हिंदू युवा वाहिनीच्या बलाढ्य उमेदवाराचा सामना करावा लागला असता. मठाच्या वतीने अशी व्यवस्था करण्यात आली होती, की गोरखपूरमध्ये राहायचं असेल तर योगी-योगी म्हणावंच लागेल.
advertisement
योगींचे विरोधक त्यांच्या कार्यशैलीची चर्चा करत आहेत. त्यामध्ये 2018मध्ये गोरखपूरमध्ये आणि 2023 मध्ये घोसी इथे झालेल्या पोटनिवडणुकीचा मोठा वाटा आहे. खरं तर, 2017मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना त्यांची लोकसभेची जागा सोडावी लागली होती. त्यानंतर गोरखपूरमध्ये पोटनिवडणूक झाली आणि योगींचा बालेकिल्ला असलेली जागा भाजपने गमावली. साहजिकच सीएम योगींवर प्रश्न उपस्थित झाले. पोटनिवडणुकीत आपल्या आवडीच्या व्यक्तीला तिकीट न मिळाल्याने योगींनी जाणीवपूर्वक मनापासून प्रचार केला नाही, असं मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांचं म्हणणं होतं. तसंच घोसी पोटनिवडणुकीतील पराभवानंतर चर्चा झाली, की दारासिंह चौहान आमदार व्हावेत अशी योगींची इच्छा नव्हती. कारण, ते चौहान यांना भाजपमध्ये आणण्याच्या निर्णयाने आनंदी नव्हते. एकूणच, योगी आदित्यनाथ यांना डिवचल्यास ते काही ना काही प्रतिक्रिया नक्कीच देतात, असं म्हटलं जातं.
advertisement
काय आहे योगी समर्थकांच्या नाराजीचं कारण?
यूपीमध्ये योगी समर्थक नाराज होण्यासाठी अनेक कारणं आहेत. भाजपमध्ये योगींना सावत्र असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. योगी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतात, त्या तुलनेत निवडणूक प्रचारासाठी त्यांना पूर्ण अधिकार दिला जात नाही. त्यांच्या अनेक समर्थकांना तिकीटही मिळू शकलेलं नाही. योगींना आपल्या मर्जीतले अधिकारी नेमण्याचेदेखील अधिकार मिळत नसल्याने योगी समर्थक नाराज आहेत.
advertisement
आपण केंद्रीय नेतृत्वावर नाराज असल्याचं योगींनी उघडपणे कधीही दाखवलं नाही. उत्तर प्रदेशात भाजपचे अनेक नेते योगींना महत्त्व देत नाहीत. महिला खेळाडूंशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेला नेता ब्रजभूषण शरण सिंह बुलडोझर कारवाईचं निमित्त करून योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट टीका करत आला आहे. मंत्रिमंडळातले काही मंत्रीदेखील योगींच्या आदेशाचा अनादर करत आहेत. या सर्व गोष्टींमुळे राजपूत समाजातल्या लोकांचं असं मत तयार झालं आहे, की मोदी सरकार मजबूत झाल्यानंतर योगींना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं जाईल.
advertisement
योगी आणि राजपूत मतदारांच्या नाराजीच्या संबंधात तथ्य नाही
उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव आणि राजपूत मतदारांच्या नाराजीचा संबंध जोडण्यात तथ्य नसल्याचं निवडणूक निकालावरून स्पष्ट झालं आहे. राहुल गांधींनी रायबरेलीमध्ये सुमारे साडेचार लाख मतांनी विजय मिळवला आहे. त्या तुलनेत राजनाथ सिंह यांचा विजय किरकोळ आहे. याचा अर्थ राजपूतांनी राजनाथ सिंह यांनाही मतं दिली नाही का, असा होतो. राजपूतांनी भाजपला मतदान केलं नसतं, तर गाझियाबादमध्ये भाजपचे उमेदवार अतुल गर्ग साडेतीन लाख मतांनी विजयी झाले नसते. नोएडामध्येही भाजपचे महेश शर्मा मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी राजपूत मतदारांचं प्राबल्य आहे. बुलंदशहरमध्ये राजपूतांची संख्या जास्त आहे. तिथेही भाजपचा विजय झाला आहे.
अलीगढमध्ये भाजपने अगदी कमी फरकाने विजय मिळवला. राजपूतबहुल बरौली विधानसभा मतदारसंघातून 35 हजारांची आघाडी मिळाल्याने हा विजय शक्य झाला. डुमरियागंजमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार हरिशंकर तिवारी यांचे पुत्र कुशल तिवारी हे भाजपच्या राजपूत उमेदवार जगदंबिका पाल यांच्याविरोधात लढत होते. जगदंबिका पाल यांनीही विजय मिळवला आहे.
भाजपला मतं का मिळाली नाहीत याबाबत विचारमंथन करावं लागेल. राजपूत मतांसाठी योगी आदित्यनाथ यांना दोष देऊन भाजप स्वतःचंच नुकसान करील. आयोध्येतून उभे असलेले लल्लू सिंग हेदेखील राजपूत उमेदवार होते. राजपूत स्वत:ला रामाचे वंशज मानतात. असं असताना त्या ठिकाणी राजपूतांनी भाजपला मतं का दिली नाहीत, याचा विचार भाजपने करावा, असं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या/देश/
UP Politics : उत्तर प्रदेशात भाजपची जादू ओसरण्याला योगी आदित्यनाथ जबाबदार? काय आहे Inside Story?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement