कोविडच्या नव्या व्हेरियंट उद्रेक, मुंबईतही मृत्यू; विषाणू सांडपाण्यातही आढळल्याने लसीकरण निष्प्रभ ठरण्याची शक्यता

Last Updated:

चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडमध्ये कोविड-19 ची नवीन लाट आली आहे. सिंगापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. JN.1 आणि LF7 या ओमिक्रॉन सबव्हेरियंट्समुळे प्रादुर्भाव वाढला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: कोविड-19 ने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडसारख्या आशियाई देशांमध्ये कोविड-19 ची एक नवीन लाट आली आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात चिंता वाढली आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईतील केईएम रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 च्या रुग्णांमध्ये होत असलेल्या या वाढीचे मुख्य कारण नवीन ओमिक्रॉन सबव्हेरियंट्स, जसे की JN.1 आणि त्याचे संबंधित व्हेरियंट LF7 असल्याचे मानले जात आहे.
सिंगापूरमध्ये मे 2025 च्या सुरुवातीलाच या संसर्गामुळे बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढून 14,000 पेक्षा जास्त झाली. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या 11,100 होती. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र अतिदक्षता विभागातील (ICU) रुग्णांमध्ये थोडी घट झाली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सध्याचे व्हेरियंट्स पूर्वीच्या तुलनेत अधिक संक्रामक किंवा गंभीर नाहीत. या वाढीचे कारण लोकांची कमी झालेली प्रतिकारशक्ती असू शकते. सध्या LF.7 आणि NB.1.8 व्हेरियंट्स प्रमुख आहेत, जे JN.1 चेच व्हेरियंट्स आहेत.
advertisement
काय आहे हा JN.1 स्ट्रेन?
JN.1 हा ओमिक्रॉन BA.2.86 चा एक उपप्रकार आहे. ज्याची ओळख ऑगस्ट 2023 मध्ये झाली. डिसेंबर 2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून वर्गीकृत केले होते. या व्हेरियंटमध्ये सुमारे 30 म्युटेशन्स (उत्परिवर्तन) आहेत. जे रोगप्रतिकारशक्तीला चकमा देण्यासाठी तयार झाले आहेत आणि हे त्यावेळीच्या इतर व्हेरियंट्सपेक्षा अधिक होते. मात्र BA.2.86 2023 च्या अखेरीस SARS-CoV-2 चा प्रमुख स्ट्रेन म्हणून उदयास आला नाही.
advertisement
JN.1, BA.2.86 चा उपप्रकार असून आता एक किंवा दोन अतिरिक्त म्युटेशन्समुळे अधिक प्रभावीपणे पसरण्यास सक्षम आहे. जरी यात त्याच्या व्हेरियंटप्रमाणेच रोगप्रतिकारशक्तीला चुकवण्याची क्षमता कायम आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे म्हणणे आहे की JN.1 आता अधिक प्रभावीपणे पसरण्यासाठी विकसित झाला आहे. सिंगापूरमध्ये कोविड-१९ विषाणू सांडपाण्यातही आढळला आहे. हा नवीन व्हेरियंट पूर्वीपेक्षा वेगाने पसरणारा आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
advertisement
साथीच्या रोगाच्या आठवडा 12 दरम्यान WHO च्या सर्व चार क्षेत्रांमध्ये JN.1 व्हेरियंट सर्वात सामान्य SARS-CoV-2 व्हेरियंट राहिला, ज्यात पश्चिम पॅसिफिक क्षेत्रात (WPR) 93.9%, दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रात (SEAR) 85.7%, युरोपियन क्षेत्रात (EUR) 94.7% आणि अमेरिका क्षेत्रात (AMR) 93.2% चा समावेश होता.
काय सध्याच्या कोविड-19 लस JN.1 स्ट्रेनवर...
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की JN.1 व्हेरियंटसाठी शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला निष्प्रभावी करणे कठीण आहे. जिवंत विषाणू आणि प्रयोगशाळेत तयार केलेल्या स्यूडो-व्हायरसवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की लसीकरण किंवा पूर्वीच्या संसर्गातून मिळालेली अँटीबॉडीज JN.1 ला पूर्वीच्या व्हेरियंट्सच्या तुलनेत कमी प्रभावीपणे अवरोधित करतात. याचा अर्थ JN.1 शरीराच्या सध्याच्या रोगप्रतिकारशक्तीपासून अंशतः बचाव करू शकतो. WHO ने म्हटले आहे की XBB.1.5 मोनोव्हेलेंट बूस्टर, जी विशेषतः ओमिक्रॉनच्या XBB.1.5 उपव्हेरियंटला लक्ष्य करण्यासाठी डिझाइन केलेली कोविड-19 लस आहे, ती अनेक अभ्यासांमध्ये JN.1 व्हेरियंटच्या विरोधात संरक्षण वाढविण्यात प्रभावी असल्याचे आढळले आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
कोविडच्या नव्या व्हेरियंट उद्रेक, मुंबईतही मृत्यू; विषाणू सांडपाण्यातही आढळल्याने लसीकरण निष्प्रभ ठरण्याची शक्यता
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement