कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसमोर आता नवी समस्या; निवडणूक घ्यायलाही पैसे नाहीत
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सध्या पाकिस्तान आर्थिक संकटांना तोंड देत आहे. त्यातच आता देशासमोर आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
इस्लामाबाद, 6 नोव्हेंबर : सध्या पाकिस्तान आर्थिक संकटांना तोंड देत आहे. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. अन्न-धान्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता पाकिस्तानसमोर नवं संकट निर्माण झालं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक घ्यायला देखील त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. पाकिस्तान आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, आता वर्ल्ड बँक आणि अन्य देशांकडून आणखी कर्ज घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंदाजे 47 अब्ज रुपये एवढा खर्च येण्याची शक्यता आहे. मात्र पाकिस्तान सरकारला आतापर्यंत केवळ 27 अब्ज रुपयांचीच व्यवस्था करण्यात यश आलं आहे. पैशांची व्यवस्था होत नसल्यानं निवडणूक आयोगाकडून देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी आठ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.
advertisement
या बाबत माहिती देताना पाकिस्तानच्या आर्थिक विभागानं म्हटलं की, देशात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुकांसाठी 47 अब्ज रुपयांपेक्षा अधिक खर्च लागणार आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 27 अब्ज रुपयांची व्यवस्था झाली आहे. त्यापैकी17.4 अब्ज रुपये निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आले आहेत. यावर निवडणूक आयोगाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगानं चिंता करू नये, निवडणुकीपर्यंत आम्ही पैशांची व्यवस्था करू असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
December 06, 2023 11:51 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसमोर आता नवी समस्या; निवडणूक घ्यायलाही पैसे नाहीत


