advertisement

Dawood Ibrahim : पाकिस्ताननेच दाऊद इब्राहिमला संपवलं? पाकच्या पत्रकाराचा खळबळजनक दावा

Last Updated:

भारताचा मोस्ट वॉटेन्ड दहशतवादी दाऊद इब्राहिम जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला? या विषयाची गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

News18
News18
नवी दिल्ली, 19 डिसेंबर : भारताचा मोस्ट वॉटेन्ड दहशतवादी दाऊद इब्राहिम जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला? या विषयाची गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दाऊद चर्चेमध्ये आला आहे. दुसरीकडे दाऊद इब्राहिमबाबत पाकिस्तानी पत्रकार आरजू काजिमी यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
त्यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे. पाकिस्तान सध्या आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानवर आयएमएफ, वर्ल्ड बँकेसह अनेक संस्थांचा दबाव आहे. त्यामुळे पाकिस्तान दाऊद इब्राहिमला मारू देखील शकते असा दावा आरजू काजिमी यांनी केला आहे.
पुढे बोलताना काजमी म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत अशाप्रकारे अनेक दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे. मात्र आता लोकांमधून असा प्रश्न उपस्थित होत आहे की, अशाप्रकारच्या दहशतवादी संघटना चालवणाऱ्या प्रमुखांना कधी मारलं जाणार? पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनने देखील याबाबत पाकिस्तानवर दबाव टाकला आहे. पाकिस्तानमध्ये अशाप्रकारचे लोक नकोत असं चीनचं म्हणणं आहे. त्यामुळे पाकिस्ताननेच दाऊदला संपवल्याची शक्यता आहे.
advertisement
दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये राहातो असं पाकिस्तान सरकारने अजूनपर्यंत कधीही अधिकृतरित्या सांगितलेलं नाहीये. कारण त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आता जर दाऊदला मारलं असेल किंवा एखाद्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाला असेल तर ही गोष्टी पाकिस्तान जगासमोर कधीच येऊ देणार नाही असंही काजिमी यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Dawood Ibrahim : पाकिस्ताननेच दाऊद इब्राहिमला संपवलं? पाकच्या पत्रकाराचा खळबळजनक दावा
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement