बांगलादेश निवडणुकीतील विजयाबद्दल तारिक रहमान यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांना बांगलादेशच्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन दिले आणि भारत बांगलादेश मैत्री, शांतता व प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बांगलादेशच्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी बांगलादेशच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या रहमान यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा आणि पाठिंबा दिला.
उभय देशांमधील घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत आणि बांगलादेश हे खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांनी बांधलेले जवळचे शेजारी आहेत. दोन्ही देश आणि तेथील जनतेला शांतता, प्रगती आणि समृद्धी मिळवून देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
advertisement
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“तारिक रहमान यांच्याशी बोलून आनंद झाला. बांगलादेशच्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले.
बांगलादेशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मी शुभेच्छा आणि पाठिंबा दर्शवला.
खोलवर रुजलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असलेले दोन जवळचे शेजारी म्हणून, मी दोन्ही देशांच्या जनतेला शांतता, प्रगती आणि समृद्धी मिळवून देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 8:02 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
बांगलादेश निवडणुकीतील विजयाबद्दल तारिक रहमान यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन








