advertisement

Sunetra Pawar: रोहित पवारांनी आरोप केलेल्या नरेश अरोरांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

Last Updated:

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नरेश अरोरा यांच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते.  अजित पवार यांना नरेश अरोरा यांचं

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्यावरील डोंगराएवढं दु:ख बाजूला ठेवून कामाला लागल्या आहेत. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे अशातच पुण्याच्या दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार यांची नरेश अरोरा यांनी भेट घेतली. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या वेळी अचानक गायब झालेले नरेश अरोरा हे आज पुण्यात भेटीसाठी पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
पुण्यात पार्थ पवार आणि जय पवार सर्किट हाऊसमध्ये उपस्थितीत आहे.  आज सकाळपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थतीत सर्किट हाऊस इथं बैठका सुरू आहे.  संध्याकाळी पार्थ आणि जय पवार देखील दोघेही सर्किट हाऊसवर हजर होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी नरेश अरोरा देखील बैठकीला पोहोचले होते.  सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्यासोबत नरेश अरोरा यांची बैठक जवळपास अर्धातास चालली. ही बैठक आता संपली आहे. पण, या बैठकीत काय चर्चाा झाली, याची तपशील समोर अद्याप येऊ शकली नाही.
advertisement
राष्ट्रवादीच्या बैठकीत झाला होता वाद
पण, काही दिवसांपूर्वी जेव्हा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली, या बैठकीला नरेश अरोरा हजर होते. यावेळी नरेश अरोरा यांनी काही सल्ले दिले होते. पण, यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. त्यानंतर बराच वाद झाला, त्यानंतर नरेश अरोरा हे तिथून निघून गेले होते.
advertisement
रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेत उल्लेख
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नरेश अरोरा यांच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते.  अजित पवार यांना नरेश अरोरा यांचं राजकीय सल्लागार म्हणून नको असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. तसंच नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सच्या कॅम्पेन विषयी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात वाद झाल्याची ही चर्चा आहे. तसंच अरोरा यांचं काँट्रक्ट संपत आल्याची ही माहिती रोहित पवार यांनी दिली होतो. या सगळ्या गोष्टी पाहता नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Sunetra Pawar: रोहित पवारांनी आरोप केलेल्या नरेश अरोरांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement