O'Romeo : पिळदार मिशा, भारदस्त बॉडी! शाहिद कपूरवर भारी पडले राहुल देशपांडे, 'तो' सीन होतोय व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
शास्त्रीय संगीताच्या दुनियेत आपला दबदबा निर्माण करणारे गायक राहुल देशपांडे यांनी 'ओ रोमियो' मधून बॉलिवूडमध्ये जो काही राडा केलाय, तो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
मुंबई : ज्या सिनेमाच्या ट्रेलरनेच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, तो शाहीद कपूरचा 'ओ रोमियो' अखेर थिएटरमध्ये धडकला आहे. शाहीदचा तो खतरनाक गँगस्टर लूक आणि अंगावर काटा आणणारी अॅक्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. पण, खरी चर्चा रंगली आहे ती शाहीदची नाही, तर एका मराठमोळ्या गायकाची. शास्त्रीय संगीताच्या दुनियेत आपला दबदबा निर्माण करणारे गायक राहुल देशपांडे यांनी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये जो काही राडा केलाय, तो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
गायनच नाही, तर अभिनयातही राहुल देशपांडेंचा दबदबा
'ओ रोमियो'मध्ये राहुल देशपांडे केवळ पार्श्वगायन करण्यासाठी आलेले नाहीत, तर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि डॅशिंग भूमिका साकारली आहे. राहुल यांनी या सिनेमात 'इन्स्पेक्टर पाठारे' ही भूमिका बजावली आहे. नेहमी सुरांमध्ये रमणारे राहुल जेव्हा हातात बंदूक घेऊन खाकी वर्दीत पडद्यावर आले, तेव्हा प्रेक्षकांच्या शिट्ट्या थांबल्या नाहीत. विशेष म्हणजे, त्यांनी बॉलिवूडची सध्याची नॅशनल क्रश तृप्ती डिमरीसोबत स्क्रीन शेअर केली असून, या दोघांमधील सीनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
advertisement
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
राहुल देशपांडे यांच्या या बॉलिवूड पदार्पणाने मराठी चाहत्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. सोशल मीडियावर सध्या राहुल यांच्या अभिनयाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अंकिता शेगडे या चाहतीने एक भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलंय, "राहुल दादा, तुझा पहिला बॉलिवूड सिनेमा! हा फक्त एक चित्रपट नाही, तर तुला मेहनत करताना पाहणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे." या पोस्टवर हजारो लोकांनी कमेंट्स करत राहुल यांचं अभिनंदन केलं आहे. गळ्यातली सूर आणि वर्दीतला बाणा या दोन्ही गोष्टी राहुल यांनी लिलया पेलल्या आहेत.
advertisement
advertisement
'ओ रोमियो'ची तगडी स्टारकास्ट
'ओ रोमियो'मध्ये केवळ शाहीद आणि तृप्तीच नाहीत, तर रणदीप हुड्डा, नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, दिशा पटानी आणि अविनाश तिवारी यांसारखी दिग्गज कलाकारांची फौज आहे. अशा तगड्या स्टारकास्टमध्ये राहुल देशपांडे यांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेचं सोनं केलं असून, त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. याआधी त्यांनी 'मी वसंतराव' या मराठी सिनेमात आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती, पण बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर त्यांचं हे रूप प्रेक्षकांसाठी सुखद धक्का ठरलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 7:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
O'Romeo : पिळदार मिशा, भारदस्त बॉडी! शाहिद कपूरवर भारी पडले राहुल देशपांडे, 'तो' सीन होतोय व्हायरल







