Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! आता भुयारी मेट्रोने सुस्साट प्रवास, लवकरच दुसरा टप्पा सेवेत

Last Updated:

Mumbai Metro: मुंबईकरांचा प्रवास आता सुस्साट होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील भुयारी मेट्रो लवकरच सुरू होणार आहे.

मुंबईकरांसाठी खूशखबर! आता भुयारी मेट्रोने सुस्साट प्रवास, लवकरच दुसरा टप्पा सेवेत
मुंबईकरांसाठी खूशखबर! आता भुयारी मेट्रोने सुस्साट प्रवास, लवकरच दुसरा टप्पा सेवेत
मुंबई: मुंबईतील महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. कुलाबा ते सिप्झ मेट्रो- 3 प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी शेवटची पायरी उरली आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) दरम्यानच्या 9.77 किमी लांबीच्या मार्गावर ‘कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी’ (CMRS) पथकाने तपासणी सुरू केली असून, काही दिवसांत मेट्रोसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
सोमवारपासून या मार्गाची सुरक्षा चाचणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील तीन-चार दिवस ती सुरू राहणार आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर CMRS कडून अंतिम प्रमाणपत्र दिलं जाईल. हे प्रमाणपत्र मिळताच दुसऱ्या टप्प्याचा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाईल.
मेट्रो-3 चा विस्तार
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून 33.5 किमी लांबीच्या मेट्रो-3 मार्गावर काम सुरू आहे, ज्यात एकूण 27 स्थानकांचा समावेश आहे. यातील पहिला टप्पा आरे ते बीकेसी ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाला आहे. सध्या 10 स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात बीकेसीपासून वरळी नाक्याजवळील आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या टप्प्यात एकूण 7 स्थानकांचा समावेश आहे. बीकेसी, धारावी, शितळादेवी मंदिर, दादर, सिद्धीविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे.
advertisement
एमएमआरसीने या टप्प्यातील तांत्रिक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या असून, CMRS कडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे आरे ते वरळी दरम्यानचा प्रवास आणखी सोयीस्कर व जलद होणार आहे.
महत्वाचे
दुसऱ्या टप्प्याची लांबी – 9.77 किमी
नवीन सुरू होणारी स्थानके – 7
संभाव्य सुरुवात – एप्रिल दुसऱ्या आठवड्यात
advertisement
प्रवाशांना दिलासा – ट्राफिकपासून मुक्ती व वेळेची बचत
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! आता भुयारी मेट्रोने सुस्साट प्रवास, लवकरच दुसरा टप्पा सेवेत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement