फुल नेटवर्क असुनही OTP येत नाहीये? फोनच्या मेसेज बॉक्समध्ये करा हा छोटासा बदल 

Last Updated:

OTP not Receiving Problem Fix: आजच्या डिजिटल युगात अनेक कामांसाठी ओटीपीचा वापर केला जातो. आपल्या सुरक्षेसाठी ओटीपी वापरला जातो. मात्र अनेकदा नेटवर्क असुनही ओटीपी येत नाही. ही समस्या कशी दूर करायची पाहूया...

ओटीपी प्रॉब्लम
ओटीपी प्रॉब्लम
OTP not Receiving Problem Fix: कोणतंही महत्त्वाचं काम करण्यासाठी आता आपल्याला ओटीपी टाकावा लागतो. मात्र अनेकदा आपण एका महत्त्वाच्या OTP ची वाट पाहतो. परंतु काही कारणास्तव, OTP येत नाही. OTP बँकेशी संबंधित असेल, तर ही एक मोठी समस्या असू शकते. कधीकधी, आपण WhatsApp किंवा इतर अ‍ॅप्समध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु OTP वेळेवर येत नाही, ज्यामुळे वेळ संपतो. आपल्याला वाटतं की हा प्रॉब्लम नेटवर्क खराब असल्याने येतोय. पण तसं नसतं. तुम्हाला वारंवार OTP रिसीव्ह समस्या येत असतील तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही एका ट्रिकने OTP मेसेज मिळवू शकता.
बऱ्याचदा, आपण एखाद्या अ‍ॅपमध्ये लॉग इन करतो. तेव्हा नेटवर्क अ‍ॅक्टिव्ह असतानाही मेसेज बॉक्समध्ये OTP दिसत नाही. यामुळे अनेकदा यूझर घाबरतात. तुमच्यासोबत असे घडले तर काळजी करण्याची गरज नाही. कधीकधी मेसेज किंवा OTP स्पॅम बॉक्समध्ये येतात, म्हणूनच ते इनबॉक्समध्ये दिसत नाहीत. काही सेटिंग्जमध्ये आवश्यक बदल करून तुम्ही स्पॅम बॉक्समधील मेसेज किंवा OTP सहजपणे पाहू शकता. कसे ते जाणून घेऊया...
advertisement
ही आहे प्रोसेस
  • स्पॅम बॉक्समध्ये पाठवलेले मेसेज किंवा OTP पाहण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जावे लागेल.
  • तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला प्रोफाइल आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • तुम्हाला आता स्पॅम आणि ब्लॉक ऑप्शन दिसतील. त्यावर टॅप करा.
  • हे एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये स्पॅम लिस्टमधील मेसेज दिसतील.
  • येथून, तुम्ही तुमचे महत्त्वाचे OTP किंवा मेसेज पाहू शकता.
advertisement
OTP म्हणजे काय?
ओटीपी किंवा वन-टाइम पासवर्ड हा एक सुरक्षा कोड आहे जो फक्त एकदाच आणि लिमिटेड काळासाठी काम करतो. तुम्ही एखाद्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवर लॉग इन करता किंवा ऑनलाइन पेमेंटसाठी अ‍ॅपवर लॉग इन करता तेव्हा हा कोड तुमच्या मोबाइल नंबर, ईमेल अ‍ॅड्रेस किंवा इतर अ‍ॅपवर पाठवला जातो. त्याचा उद्देश तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित करणे आहे. तुमच्या यूझरनेम आणि पासवर्ड व्यतिरिक्त ओटीपी आवश्यक केल्याने इतर कोणालाही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करण्यापासून रोखले जाते. ओटीपी वापरताच तो एक्सपायर्ड होतो, त्यामुळे तो फसवणूक आणि हॅकिंगपासून संरक्षण करण्यास मदत करतो.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
फुल नेटवर्क असुनही OTP येत नाहीये? फोनच्या मेसेज बॉक्समध्ये करा हा छोटासा बदल 
Next Article
advertisement
Raj Thackeray : राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

View All
advertisement