फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
दोहा इथे झालेल्या फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
दोहा इथे झालेल्या फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. अलीकडेच फिडे रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्यापाठोपाठ अर्जुनने पुन्हा एकदा मिळविलेले यश जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारतासाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण ठरले आहे.
आपल्या एक्स वरील संदेशात मोदी यांनी म्हटले आहे,
“बुद्धिबळ क्षेत्रातील भारताची प्रगती अखंड सुरू आहे!
दोहा इथे झालेल्या फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक आणि त्याआधी अलीकडेच फिडे रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मिळविलेले कांस्य पदक या यशाबद्दल अर्जुन एरिगैसी याचे मनःपूर्वक अभिनंदन. त्याचे कौशल्य, संयम आणि बुद्धिबळाविषयीची आवड आदर्श आहे. त्याची यशोगाथा आपल्या तरुण पिढीला सातत्याने प्रेरणा देत राहील. त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 6:56 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन











