अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या पावन प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आणि जगभरातील भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या पावन प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आणि जगभरातील भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी या वर्धापनदिनाचे वर्णन भारताच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचा एक दिव्य उत्सव असे केले. त्यांनी भारत आणि परदेशातील असंख्य भक्तांच्या वतीने भगवान श्री रामांच्या चरणी आदरपूर्वक वंदन केले आणि सर्व देशवासीयांना अनंत शुभेच्छा दिल्या.
शतकानुशतके जुन्या संकल्पाच्या ऐतिहासिक पूर्ततेची आठवण करून देताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, भगवान श्री रामांच्या कृपेने आणि आशीर्वादाने, पाच शतकांतील लाखो भक्तांची पवित्र आकांक्षा पूर्ण झाली आहे. रामलल्ला आता पुन्हा एकदा आपल्या भव्य निवासस्थानी विराजमान झाले आहेत. यावर्षी अयोध्या नगरी धर्मध्वज आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठा द्वादशीच्या प्रतिष्ठेची साक्षीदार झाली आहे. गेल्या महिन्यात या धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्याची संधी लाभणे आपले सौभाग्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
advertisement
मोदी यांनी पुढे अशी इच्छा व्यक्त केली की, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांची प्रेरणा प्रत्येक नागरिकाच्या हृदयात सेवा, समर्पण आणि करुणेची भावना अधिक दृढ करो. ही मूल्ये समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी एक मजबूत पाया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
एक्स (X) या समाज माध्यमावरील एका थ्रेड पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:
advertisement
“अयोध्या जीच्या पावन धरतीवर आज रामलल्लांच्या प्राण-प्रतिष्ठेचा दुसरा वर्धापनदिन साजरा होत आहे. हा वर्धापनदिन आपल्या आस्था आणि संस्कारांचा एक दिव्य उत्सव आहे. या पावन प्रसंगी देश-विदेशातील सर्व रामभक्तांच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या चरणी माझे कोटी-कोटी नमन आणि वंदन! समस्त देशवासीयांना माझ्या अनंत शुभेच्छा.
भगवान श्रीरामांच्या असीम कृपा आणि आशीर्वादाने असंख्य रामभक्तांचा पाच शतकांचा संकल्प साकार झाला आहे. आज रामलल्ला पुन्हा आपल्या भव्य धामात विराजमान झाले आहेत आणि यावर्षी अयोध्या नगरी धर्मध्वज, रामलल्लांच्या प्रतिष्ठा द्वादशीची साक्षी बनत आहे. मागील महिन्यात या ध्वजाची पुण्यस्थापना करण्याची सुसंधी मला लाभली , हे माझे सौभाग्य आहे.
advertisement
माझी कामना आहे की मर्यादा पुरुषोत्तमांची प्रेरणा प्रत्येक देशवासीयाच्या हृदयात सेवा, समर्पण आणि करुणेची भावना अधिक प्रगाढ करो, जी समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी सशक्त आधार बनेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 6:51 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा











