विठ्ठलाच्या प्रसादात अळ्या आणि बुरशी! भाविकांच्या भावना दुखावल्या; समितीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Solapur News : पंढरपूरच्या विठुरायाचा प्रसाद म्हणजे लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा आणि पवित्रतेचा ठेवा. मात्र, याच प्रसादाच्या पाकिटात...
Solapur News : पंढरपूरच्या विठुरायाचा प्रसाद म्हणजे लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा आणि पवित्रतेचा ठेवा. मात्र, याच प्रसादाच्या पाकिटात अळ्या आणि लाडुला बुरशी आढळल्याने भक्तांच्या भावनांना मोठा धक्का बसला आहे. एका भाविकाने लाडू प्रसादातील हा किळसवाणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून समाज माध्यमांवर व्हायरल केला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.
समितीचा ढिसाळ आणि भोंगळ कारभार
या घटनेमुळे मंदिर समितीचा ढिसाळ आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सध्या मंदिर समितीचे अध्यक्षपद रिक्त असून, कार्यकारी अधिकारीही रजेवर आहेत. संपूर्ण कारभार 'प्रभारी' अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप भाविकांमधून केला जात आहे. विठ्ठलाच्या प्रसादाबाबत दाखवलेल्या या निष्काळजीपणामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
advertisement
संबंधिक कामगारांना बजावली नोटीस
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मंदिर समितीने लाडूच्या पाकिटात अळी आढळल्याचे मान्य केले आहे. हा प्रकार गंभीर असून, संबंधित कामगारांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे प्रभारी व्यवस्थापकांनी सांगितले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 02, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
विठ्ठलाच्या प्रसादात अळ्या आणि बुरशी! भाविकांच्या भावना दुखावल्या; समितीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर









