Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीस सिद्धीविनायकाच्या चरणी! बाप्पांच्या दर्शनाचे फोटो आले समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Maharashtra CM Oath Ceremony : आझाद मैदानावर आज फक्त तीन नेत्यांचाच शपथविधी पार पडणार आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.
महायुतीचा आज मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला काही तासात सूरूवात होणार आहे.संध्याकाळी 5 वाजल्यानंतर शपथविधीला सूरूवात होणार आहे.

या शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात दाखल झाले आहेत. येथे त्यांनी सिद्धीविनायकाचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले आहे. या संबंधित फोटोही समोर आले आहेत.
advertisement

यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
advertisement

यानंरत आता देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीच्या मंदिराकडे निघाले आहेत. येथे देखील त्यांनी मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे. यावेळी देखील त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
advertisement

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांना शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. पण या सोहळ्याला हे तीनही नेते उपस्थित राहणार नाही आहेत.
advertisement

दरम्यान या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या दोन बड्या नेत्यांसह भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
advertisement

आझाद मैदानावर आज फक्त तीन नेत्यांचाच शपथविधी पार पडणार आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2024 12:39 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीस सिद्धीविनायकाच्या चरणी! बाप्पांच्या दर्शनाचे फोटो आले समोर


