Papaya Farming: ऊस शेतीचा नाद सोडला अन् लावलं पैशाचं पीक, आता 2 एकरात 10 लाखांचा नफा!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Papaya farming: ऊस शेतीला फाटा देत सांगलीतील शेतकऱ्यानं 2 एकर शेतात पपईची शेती केली. यातून त्यांना 10 लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
साडेचार फूट अंतरावर सरी सोडत 9 बाय 5 फूट अंतरावर पपईची लागवड केली. लागवडीनंतर त्यांनी ठिबक संचनाचा वापर केला. पपईवर कोणत्याही प्रकारचा रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी झाडांना आळवणी, खते, कीटकनाशक फवारण्या घेतल्या. रोगराई थेट झाडावर येऊ नये यासाठी त्यांनी स्टिकर सापळ्यांचा प्रयोग केला. लागवडीच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी बेसल डोसची मात्रा देत झाडांना मातीची भर दिली.
advertisement
आठव्या महिन्यात पहिल्या तोडीला त्यांना अगदी 4 रुपयेपासून 28 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. आजखेर मांडवे यांनी दोन एकर क्षेत्रात सुमारे 20 ते 22 तोडे केले आहेत. त्यातून तब्बल 100 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतले आहे. पिकास जवळपास दोन ते अडीच लाख खर्च आला असून यातून त्यांना 10 लाखाचा निव्वळ नफा आजपर्यंत मिळाला आहे.
advertisement
advertisement