शेतकऱ्याची कमाल, फक्त 30 गुंठ्यातून कमावले 2 लाख! PHOTOS

Last Updated:
शेती करायची म्हटलं की विविध संकटे अडचणी या आल्याच मात्र अनेक शेतकरी या संकटांवर आणि अडचणीवर मात करतात. द्राक्ष बागायतदार असलेल्या अंकुश इंगोले यांनी पपई शेतीमधून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवलं आहे.
1/7
शेती करायची म्हटलं की विविध संकटे अडचणी या आल्याच मात्र अनेक शेतकरी या संकटांवर आणि अडचणीवर मात करतात. त्यापैकीच एक आहेत जालना जिल्ह्यातील धारकल्याण येथील रहिवासी असलेले अंकुश इंगोले. द्राक्ष बागायतदार असलेल्या अंकुश इंगोले यांनी पपई शेतीमधून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवलं आहे.

advertisement
2/7
चांगला दर नसल्याने द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवावी लागल्यानंतर त्यांनी पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. केवळ 30 गुंठे पपई लागवडीतून त्यांना दीड लाखांचे उत्पन्न झालंय. पाहुयात कसं केलं इंगोले यांनी पपई शेतीचे नियोजन.

3/7
जालना जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक पट्ट्यातील धारकल्याण या गावचे इंगोले हे रहिवासी आहेत. कोविड लॉकडाऊनपासून द्राक्ष शेती घाट्यात येऊ लागली. त्यामुळे द्राक्ष शेतीवर त्यांना कुऱ्हाड चालवावी लागली.

4/7
मात्र द्राक्षासाठी शेतीसाठी तयार केलेल्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी पपई हे पर्यायी पीक शोधले. 15 नंबर व्हरायटीची पपईची जात त्यांनी यासाठी निवडली. शेतामध्ये नऊ बाय पाच अशा अंतरावर या पपईची लागवड केली. बरोबर द्राक्ष बागेच्या स्ट्रक्चरमधून पपईला बाहेर काढले.

5/7
योग्य खत आणि पाण्याचे व्यवस्थापन केल्याने पपईची बाग आता बहरत आहे. आतापर्यंत त्यांनी 15 टन पपईची विक्री केली असून या पपईला 12 ते 15 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. तर आणखी चार ते पाच पपईचे उत्पन्न त्यांना अपेक्षित असून एकूण दीड ते 2 लाख रुपये उत्पन्न त्यांना पपई शेतीमधून होणार आहे.

6/7
द्राक्षांना भाव नसल्याने पपई शेतीकडे वळलो. अनेक अडचणी आल्या. मध्यंतरी पाणी कमी असल्याने पपई काढून टाकावी असा विचारही मनात आला. परंतु इकडून तिकडून ॲडजस्ट करून पाण्याची सोय केली. आता पपईचे पीक जोमात आहे.

7/7
त्यामुळे आणखी चार ते पाच टन उत्पन्न देखील अशी अपेक्षा आहे. द्राक्षांना मिळत असलेल्या कमी दर यामुळे पर्यायी पिके घ्यावी लागत असल्याचे अंकुश इंगोले यांनी सांगितलं. पपईच्या शेतीमधून दीड लाखांचे उत्पन्न झालं असून आणखी 50 हजारांचे उत्पन्न होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement