Agriculture News : शिक्षण फक्त दहावी, बनवले अनोखे जुगाड, बोअरमधून मोटार काढता येणार लगेच

Last Updated:
शेतकरी आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी बोअरवेल घेतात. त्यात मोटार आणि पाईप टाकण्यासाठी कष्ट सोसावे लागतात.
1/7
शेतकरी आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी बोअरवेल घेतात. त्यात मोटार आणि पाईप टाकण्यासाठी कष्ट सोसावे लागतात. परंतु आता ते काम सोपे झाले असून ट्रॅक्टर कप्पीने काही तासात हे काम शेतकऱ्यांना करता येणार आहे.

advertisement
2/7
या व्यवसायातून अर्जुन साठे महिन्याला 90 हजार रुपयांची कमाई करत आहेत. याबाबत अधिक माहिती कप्पी चालक अर्जुन साठे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

3/7
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गावात राहणाऱ्या अर्जुन साठे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. ते दहा ते पंधरा वर्षांपासून बोरवेलमधील मोटर काढण्याचे काम करत आहेत.

4/7
 जुन्या पद्धतीने बोरवेलमधील पाण्याची मोटर काढण्याचे काम करत होते. जुन्या मशीनवर बोरवेलमधील मोटर काढण्यासाठी माणसे सुद्धा जास्त लागत होती.

5/7
परंतु आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते आता बोरवेलमधील मोटर काढण्याचे काम करत आहेत. बोरवेलमधील एक मोटर काढण्यासाठी अर्जुन साठे 5 ते 6 हजार रुपये घेत आहेत. या व्यवसायातून ते महिन्याला सर्व खर्च वजा करून 80 ते 90 हजार रुपयांची कमाई करत आहेत.

6/7
आधुनिक पद्धतीच्या बोरवेलमधील मोटर काढण्याच्या कप्पीमुळे कामगारांचा खर्च आणि वेळेची बचत देखील होत आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेऊन अर्जुन साठे यांनी घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पुढील शिक्षण न घेता त्यांनी बोरवेलमधील मोटर काढण्याच्या कामाला सुरुवात केली.

7/7
आज ते महिन्याला या कामातून सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षाही अधिक उत्पन्न घेत आहेत. उच्च शिक्षण शिकलेल्या तरुणांनी नोकरी न मिळाल्यास लहान असो किंवा मोठा असो स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. फक्त सुरुवातीच्या दोन-तीन महिने त्रास होईल एकदा व्यवसाय व्यवस्थित सुरू झाला तर नक्कीच या व्यवसायातून आपल्याला यश मिळेल, असा सल्ला अर्जुन साठे यांनी तरुणांना दिला आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement