शिक्षण घेऊन त्याच व्यवसायात केले करिअर, तरुण करतोय वर्षाकाठी 50 लाखांची उलाढाल, पाहा यशाची कहाणी
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जालना जिल्ह्यातील एका तरुणाने डेअरी व्यवसायात स्वतःच नशीब आजमावले. सध्या हा तरुण वर्षाकाठी 50 ते 60 लाखांची उलाढाल डेअरी व्यवसायाच्या माध्यमातून करत असून वेगवेगळे प्रॉडक्ट विकून तो नफा कमवत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डेअरी व्यवसायात आवड असल्याने डेअरी टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केलं. यानंतर विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम केलं. कामाचा अनुभव आल्यानंतर स्वतःच काहीतरी अस्तित्व असावं म्हणून व्यवसाय उभारणी केली. सध्या दररोज दहा हजार लिटरपर्यंत दूध संकलित होत असून दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ निर्मिती करण्यात येत आहे. या माध्यमातून वर्षाकाठी 50 ते 60 लाखांची उलाढाल होत असल्याचं गणेश अंधारे यांनी सांगितलं.










