advertisement

तुम्ही हिवाळ्यात अंड्यांच्या नावाखाली केमिकल खाताय का? 1 मिनिटांत बनावट अंडी कशी ओळखायची?

Last Updated:
Chemical Egg : बाजारात बनावट अंडी विक्रीचे प्रकार वेगाने वाढत असून ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
1/5
egg
बाजारात बनावट अंडी विक्रीचे प्रकार वेगाने वाढत असून ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अन्न सुरक्षा विभागाने एका गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात कृत्रिमरित्या तयार केलेली अंडी जप्त केली. ही अंडी बाहेरून अगदी खऱ्यासारखी दिसत होती, मात्र ती संपूर्णपणे रसायने, कृत्रिम रंग, जिलेटिन आणि जाड करणाऱ्या पदार्थांपासून बनवलेली होती. अशा अंड्यांना कोणतेही पौष्टिक मूल्य नसते आणि त्यातील रासायनिक घटक आरोग्यास गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.
advertisement
2/5
बनावट अंडी कशी ओळखायची?
बनावट अंडी कशी ओळखायची? खरी आणि बनावट अंडी वेगळी ओळखण्यासाठी काही सोपी निरीक्षणे उपयुक्त ठरू शकतात. नैसर्गिक अंड्याचे कवच थोडे खडबडीत आणि दाणेदार असते, तर बनावट अंड्याचे कवच गुळगुळीत, एकसारखे आणि थोडे चमकदार असते. खरे अंडे हलवल्यावर कोणताही आवाज येत नाही.
advertisement
3/5
egg
परंतु खोट्या अंड्यातील द्रव वेगळ्या पद्धतीने हालत असल्याचा आवाज ऐकू येतो. कवच तुटल्यावरही फरक स्पष्ट जाणवतो. खरे अंडे सहज तुटून पातळ पडदा उघडते, तर नकली अंडे प्लास्टिकसारखे तुटते आणि मोठे तुकडे पडतात. अंड्यातील पिवळ बलक आणि पांढरा भागही बदललेला दिसतो. खऱ्या अंड्याचा बलक टणक आणि गोल असतो, तर नकली अंड्याचा बलक सैल पडलेला आणि सहज तुटणारा असतो. पांढरा भाग कधी खूप जाड, तर कधी पूर्णतः पाण्यासारखा दिसतो. शिजवताना नकली अंडी असमानपणे शिजतात आणि त्यांची चवही विचित्र जाणवते.
advertisement
4/5
agricutlure
शरीरावर परिणाम काय होताय? या प्रकारची कृत्रिम अंडी खाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यातील रसायनांमुळे पोटदुखी, पचन बिघडणे, अ‍ॅलर्जी, संक्रमण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळ सेवन केल्यास शरीरात रसायनांचा साठा होऊन गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
advertisement
5/5
agriculture
काय काळजी घ्यावी? या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी काही महत्त्वाच्या खबरदाऱ्या घेणे आवश्यक आहे. नेहमी विश्वासू विक्रेत्याकडून किंवा विश्वसनीय ब्रँडकडूनच अंडी खरेदी करावीत. पॅकेजिंग, लेबल आणि उत्पादनाची माहिती काळजीपूर्वक तपासावी. घरच्या घरी लहान चाचण्यांद्वारे अंडे खरे की बनावट हेही तपासता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा गैरप्रकारांबद्दल जागरूक राहणे आणि इतरांना सतर्क करणे असते.
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement