Success Story : शिक्षण सुरू असतानाच तरुण व्यवसायाकडे वळला, वर्षाला 7 लाख कमाई, काय आहे फॅार्म्युला?

Last Updated:
घरची आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नसल्याने वडिलांकडून शिक्षणासाठी आवश्यक तेवढा आर्थिक पाठिंबा मिळणे कठीण होते. त्यामुळे महेश याने शिक्षणासोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय केला.
1/7
सध्याला अनेक तरूण शिक्षण घेत असतानी व्यवसायकडे वळत आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील महेश राठोड हा 22 वर्षीय तरूणही सध्या बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत आहे.

advertisement
2/7
घरची आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नसल्याने वडिलांकडून शिक्षणासाठी आवश्यक तेवढा आर्थिक पाठिंबा मिळणे कठीण होते. त्यामुळे महेश याने शिक्षणासोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय केला. त्याच्यातील ही जिद्द आणि वेगळं काहीतरी करण्याची तळमळ आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

3/7
महेशला सुरुवातीपासूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. त्याने युट्यूब आणि सोशल मीडियावरील व्हिडिओजच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेतली.

4/7
अनेक पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर शेवटी त्याने पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. योग्य माहिती, नियोजन आणि सातत्य यामुळे त्याने हा व्यवसाय यशस्वीपणे उभा केला.

5/7
आज महेश मागील दोन वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत असून त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये सुमारे 5000 पक्षी आहेत. या व्यवसायातून त्याला वर्षाला साधारण 6 ते 7 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. प्रारंभी काही अडचणी आल्या असल्या तरी महेश याने चिकाटी आणि आत्मविश्वासाने सर्व संकटांचा सामना केला. त्याच्या मेहनतीमुळे आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे.

6/7
महेश फक्त पोल्ट्री व्यवसाय करत नाहीत तर त्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या खताचा उपयोग शेतीसाठीही करतो. सेंद्रिय खताचा वापर करून त्याने उत्पादनात चांगली वाढ केली असून, शेतीचा खर्चही कमी झाला आहे. यामुळे त्याला दुहेरी फायदा मिळत आहे.

7/7
विशेष म्हणजे महेश याने केवळ स्वतःपुरताच हा फायदा मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही योग्य दरात खत पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा व्यवसाय समाजाभिमुख ठरतो आहे. महेश राठोड याची ही प्रेरणादायी वाटचाल तरुणांसाठी एक आदर्श उदाहरण आहे की, जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणताही तरुण यशस्वी उद्योजक होऊ शकतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement