Success Story : नोकरी सोबत केली शेती, बटाटा शेतीचा प्रयोग ठरला यशस्वी, 6 लाखांचा निव्वळ नफा

Last Updated:
एका नामांकित खासगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत असतानाही शेतीची ओढ कायम असल्याने त्यांनी शेतीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने काहीतरी वेगळे करावे, या विचारातून त्यांनी बटाटा लागवडीचा मार्ग स्वीकारला.
1/5
बीड जिल्ह्यातील नित्रुड गावचा रवी पवार हा तरुण शेतकरी नोकरीसोबत शेतीत नवा प्रयोग करून यशस्वी ठरत आहे. एका नामांकित खासगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत असतानाही शेतीची ओढ कायम असल्याने त्यांनी शेतीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने काहीतरी वेगळे करावे, या विचारातून त्यांनी बटाटा लागवडीचा मार्ग स्वीकारला.

advertisement
2/5
सुरुवातीला रवी पवार यांनी केवळ अर्धा एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड करून प्रयोग सुरू केला. योग्य बियाण्यांची निवड, वेळेवर मशागत आणि पाण्याचे नियोजन यावर त्यांनी विशेष भर दिला. पहिल्याच हंगामात मिळालेल्या चांगल्या उत्पादनामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि पुढील वर्षी त्यांनी लागवडीचे क्षेत्र वाढवले. अर्धा एकरचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी एक एकरमध्ये बटाटा शेती केली.

3/5
सध्या रवी पवार दीड ते दोन एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड करत आहेत. एका हंगामात दोन एकर क्षेत्रातून ते किमान पाच ते सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादन खर्च नियंत्रित ठेवून बाजारपेठेचा योग्य अंदाज घेतल्यास बटाटा शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे त्यांच्या अनुभवातून स्पष्ट होते.

4/5
यापूर्वी ते कापूस लागवड करत होते. मात्र कापसातून मिळणारे उत्पन्न समाधानकारक नसल्याने शेतीत बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मागील तीन वर्षांपासून ते सातत्याने बटाटा शेती करत असून या काळात शेतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.

5/5
नोकरीसोबत शेतीत प्रयोग करत रवी पवार यांनी तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. आधुनिक पद्धतींचा अवलंब, योग्य नियोजन आणि मेहनत यांच्या जोरावर शेतीही फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement