Success Story : नोकरी गेली, परिस्थितीसमोर हार नाही मानली, संतोष भाजीपाला शेतीतून कमतोय वर्षाला 5 लाखांचा नफा
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अचानक हातातून रोजगार निसटल्याने कुटुंबासमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. मात्र, परिस्थितीवर हार न मानता त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
बीड जिल्ह्यातील नित्रुड या गावातील संतोष चव्हाण या तरुण शेतकऱ्याची कथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. दोन वर्षे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना त्यांना कंबरेचा आजार झाला आणि त्यामुळे नोकरी गमवावी लागली. अचानक हातातून रोजगार निसटल्याने कुटुंबासमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. मात्र, परिस्थितीवर हार न मानता त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कुटुंबियांच्या सल्ल्याने संतोष यांनी करार पद्धतीने दोन एकर शेती घेतली आणि शेती व्यवसायात हात आजमावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी विविध पिकांचा अभ्यास करून बाजारातील मागणी पाहिली. अखेर त्यांनी एका एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. मेहनत, योग्य खत व्यवस्थापन आणि वेळोवेळी सिंचनाच्या नियोजनामुळे उत्पादनात सातत्याने वाढ झाली.
advertisement
कांद्याचे उत्पादन चांगले मिळाल्यामुळे संतोष यांनी हळूहळू आपला अनुभव वाढवला आणि मार्केटशी थेट संपर्क साधला. स्थानिक व्यापाऱ्यांसोबत तसेच थेट बाजारपेठांशी जोडल्याने त्यांना मधल्या दलालांपासून मुक्तता मिळाली. त्यामुळे प्रति हंगाम साधारणतः तीन लाखांचा आणि वार्षिक जवळपास पाच लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळविण्यात ते यशस्वी झाले.
advertisement
advertisement










