आजपासून शनी तुमची घेणार परीक्षा! कोणावर येणार संकट? कोणाला मिळणार सुख?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्म, न्याय आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. शनी ग्रह दर अडीच वर्षांनी राशी बदलतो आणि काही काळात तो वक्री म्हणजेच उलट दिशेने फिरणारा होतो.
advertisement
advertisement
कसोटीचा काळ- मेष : साडेसातीचा पहिला टप्पा सुरु असल्यामुळे अपघात, आर्थिक नुकसान, कुटुंबात वाद, आणि तणाव याचा सामना करावा लागेल. सिंह : शनिच्या ढैय्यामुळे खर्च वाढतील, आरोग्य बिघडेल, नोकरीतील तणाव वाढेल. धनु : वाद, कोर्टकेसेस, नुकसान आणि गुंतवणुकीत धोका, विद्यार्थ्यांना अपेक्षित यश न मिळण्याची शक्यता. मीन : साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू. अपघात, आर्थिक नुकसान आणि वैयक्तिक संघर्ष संभवतो.
advertisement
advertisement
सकारात्मक काळ- वृषभ : नोकरी व आरोग्यात सुधारणा, आर्थिक लाभ, नवी संधी. कर्क : यश, गुंतवणुकीत फायदा, प्रेम जीवन सुधारेल, कोर्ट प्रकरणात विजय. कन्या : आर्थिक प्रगती, जुन्या मित्रांची भेट, विवाहयोग्य व्यक्तींना संधी, आरोग्य सुधारणा. तूळ : मोठ्या पदावर बढती, व्यवसायात सुधारणा, विद्यार्थ्यांना यश. मकर : साडेसाती संपली. नशिबाची साथ, आर्थिक लाभ, बेरोजगारांना नोकरी, गुंतवणूक फायदेशीर.
advertisement