तो दिवस आलाच! दिवाळी आधी शनी चाल बदलणार, या राशीच्या बँक बॅलेन्स प्रचंड वाढणार, सुख मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना कर्मफळदाता ग्रह मानले जाते. प्रत्येकाच्या कर्मानुसार शनी फळ देतात. यावर्षी दिवाळीचा सण 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना कर्मफळदाता ग्रह मानले जाते. प्रत्येकाच्या कर्मानुसार शनी फळ देतात. यावर्षी दिवाळीचा सण 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणार आहे. मात्र, या सणाच्या आधीच शनी महाराज त्यांच्या गतीत महत्त्वपूर्ण बदल करणार आहेत. या बदलामुळे अनेक राशींच्या जीवनात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
शनीचे संक्रमण : सध्या शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात स्थित आहेत. परंतु 3 ऑक्टोबर 2025 रोजी शुक्रवारी रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी ते पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. शनी या नक्षत्रात 20 जानेवारी 2026 पर्यंत विराजमान राहतील. दिवाळीपूर्वी होणारे हे संक्रमण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसारही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
मिथुन राशी : मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण विशेष लाभदायी ठरेल. या काळात अनेक धनप्राप्तीचे मार्ग खुलतील. तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील आणि प्रत्येक कार्यात तुम्हाला सकारात्मक निकाल मिळेल. अडथळ्यांपासून मुक्तता मिळाल्यामुळे व्यवसायाच्या विस्ताराला चालना मिळेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ योग्य ठरेल.
advertisement
तूळ राशी : तूळ राशीसाठी शनीचा हा बदल शुभकारक आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील आणि आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या मनासारखी कामे करण्याची संधी मिळेल. यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही स्तरांवर समाधान मिळेल. स्वप्नपूर्तीसाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल.
advertisement
कुंभ राशी : कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा पूर्व भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अत्यंत अनुकूल ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नशिबाची साथ मिळाल्याने चिंता कमी होईल. मित्रांचा सहवास आणि कुटुंबीयांचे सहकार्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालेल. नियोजित कामे वेळेत पूर्ण करता येतील आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होईल.
advertisement