Mahalaxmi Rajyog: अमावस्येच्या रात्री 10:50 वाजता नशिबाचे तारे फिरणार; या राशींना डबल राजयोगात लाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Amavashya Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या चालीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. सध्याच्या ग्रहस्थितीनुसार मंगळ धनु राशीत विराजमान आहे आणि आज 19 डिसेंबर रोजी रात्री 10:50 वाजता चंद्रसुद्धा धनु राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीपासूनच सूर्य आणि शुक्र उपस्थित आहेत. चंद्राच्या प्रवेशामुळं धनु राशीत चार ग्रहांची युती होईल, ज्यामुळं महालक्ष्मी राजयोग, लक्ष्मी-नारायण योग आणि अमावस्या योग तयार होत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
धनू - धनू राशीतच चार ग्रहांची युती होत असल्यामुळे या राशीच्या लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरशी संबंधित मोठ्या संधी मिळू शकतात. सरकारी नोकरी किंवा प्रशासनाशी संबंधित लोकांना विशेष यश मिळू शकतं. आर्थिक स्थिती भक्कम होईल आणि अचानक धनलाभाचे योग आहेत. विवाहयोग्य व्यक्तींसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. ही वेळ नशिबाला साथ देणारी ठरेल.
advertisement
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग प्रगती आणि मान-सन्मान घेऊन येईल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट भविष्यात लाभ मिळवून देऊ शकते. आर्थिकदृष्ट्या ही वेळ स्थिरता आणि समृद्धी देणारी असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








