Monthly Horoscope: खूप काळाचा संघर्ष-कष्ट फळास! सप्टेंबरमध्ये या राशींच्या भाग्योदय, आर्थिक लाभाचे योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Monthly Horoscope In Marathi: कसा असेल सप्टेंबर महिना, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पाहुया संपूर्ण सप्टेंबर महिन्याचं सर्व 12 राशींचे राशीभविष्य..
मेष (Aries) : मेष राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबरचा पूर्वार्ध अधिक शुभ आणि यशदायी असेल. महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला लाभ आणि सन्मान मिळू शकतो. या काळात विविध क्षेत्रांत तुम्ही केलेले आर्थिक प्रयत्न यशस्वी होतील. परीक्षेच्या किंवा स्पर्धेच्या तयारीत व्यग्र असलेल्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. या महिन्यात तुम्ही जमीन, वास्तू आणि वाहनं खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करू शकता. कार्यक्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र, तुमचे शत्रू पराभूत होतील. महिन्याच्या मध्यात तुम्हाला विविध स्रोतांकडून लाभ मिळतील; पण उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च जास्त असेल. भौतिक सुखसोयींवर जास्त खर्च होईल. पैशांचं व्यवस्थापन करा नाही तर कर्ज घ्यावं लागेल. या काळात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू षड्यंत्र रचतील, त्यामुळे तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. प्रेमसंबंध दृढ होतील. महिन्याच्या उत्तरार्धात रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाही तर वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यामध्ये कधी आनंद तर कधी दुःख अनुभवायला मिळेल. तुमचं करिअर आणि व्यवसायात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत नीट विचार करूनच व्यवसाय किंवा कोणत्याही योजनेत पैसे गुंतवा. आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याची सुरुवात शुभ आहे. या काळात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या विरोधकांचा पराभव होईल. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात अधिक सक्रिय व्हाल. महिन्याच्या मध्यात घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीशी संबंधित गोष्टींवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. घरात किंवा कामाच्या ठिकाणी लहान गोष्टींना महत्त्व देणं टाळा. विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकतं. नोकरदार महिलांना काम आणि घर यांच्यात समतोल राखण्यात अडचणी येऊ शकतात. कठीण काळात त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्या सर्व आव्हानांवर मात करण्यात यशस्वी होतील. जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल तर ते अधिक दृढ होतील. जर तुम्ही एखाद्याला प्रपोझ करण्याचा विचार करत असाल तर मित्राच्या मदतीने तुम्हाला यश मिळेल. बदलत्या ऋतूमध्ये स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल, नाही तर आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात.
advertisement
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या व्यक्तींना आपलं स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी या महिन्यात खूप कष्ट करावे लागतील. या महिन्यात तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचे तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. व्यवसायात अल्पकालीन नफ्याच्या नादात दीर्घकालीन तोटा टाळावा लागेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमीन, वास्तू किंवा वडिलोपार्जित मालमत्तेबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. कोणाचीही दिशाभूल किंवा थट्टा करणं टाळा. कोणाच्याही प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करू नका. नाही तर तुम्हाला अनावश्यक त्रास किंवा अपमानाला सामोरं जावं लागू शकते. जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींमध्ये मित्राची मदत मिळाल्याने हायसं वाटेल. महिन्याच्या उत्तरार्धात, तुम्हाला अचानक लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाला जावं लागेल. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्या. या महिन्यात नातेवाईकांशी चांगला ताळमेळ ठेवावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत संयम गमावू नका. प्रेमप्रकरण असो किंवा वैवाहिक जीवन, जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ देऊ नका. नाही तर नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिना थोडा आव्हानात्मक असेल. महिन्याच्या सुरुवातीपासून घरगुती आणि कामाशी संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं आव्हान असेल. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू आणि विरोधकांपासून अत्यंत सावध राहावं लागेल. काम असो किंवा घर, छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देणं टाळा. व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. नाही तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महिन्याच्या मध्यात कौटुंबिक कारणांमुळे तुमचं आर्थिक आणि वेळेचं नुकसान होऊ शकतं. मुलांशी संबंधित मोठ्या गोष्टीमुळे तुम्ही काळजीत असाल. घर आणि कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून अपेक्षेपेक्षा कमी पाठिंबा मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात, कोणत्याही नवीन प्रकल्पात किंवा व्यवसायात सामील होण्याची योजना आखत असाल तर विचारपूर्वक पुढे जा. कोणतीही जोखीम घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्या आणि गोंधळ झाल्यास माघार घ्या. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना सामान्य असेल. कठीण काळात तुमचा जोडीदार सावलीसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील. तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यात तुमचा जोडीदार महत्त्वाची भूमिका बजावेल. बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
advertisement
सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींनी सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्याही व्यक्तीवर किंवा नशिबावर अवलंबून राहू नये. महिन्याच्या सुरुवातीला मित्र आणि नातेवाईकांकडून मदत न मिळाल्याने तुमचं मन थोडं उदास राहील. कठीण काळात आव्हानांचा धैर्याने सामना करावा लागेल. दुसऱ्या आठवड्यात काही वाईट बातम्या मिळू शकतात. काही गोष्टींबाबत वडिलांकडून विरोध आणि मानसिक त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा. नाही तर त्यामुळे अपमान होऊ शकतो. व्यवसायात खूप विचारपूर्वक पैसे गुंतवा. कोर्टात एखादं प्रकरण सुरू असेल तर परस्पर संमतीने बाहेर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या उत्तरार्धात लांब किंवा कमी पल्ल्याच्या प्रवास करावा लागण्याची दाट शक्यता आहे. प्रवास फायदेशीर ठरेल आणि नवीन ओळखी होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील; पण तरीही तुमचा खर्च जास्त राहील. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. लव्ह पार्टनर असो किंवा लाइफ पार्टनर, या महिन्यात तुमचा अहंकार मध्ये येऊ देऊ नका. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. संवादाने कोणताही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याशी तडजोड करू नका. नाही तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं.
advertisement
कन्या (Virgo) : कन्या राशीच्या व्यक्तींना या महिन्यात गर्व आणि अपमान दोन्ही टाळावं लागेल. तुमच्याशिवाय इतरांचं कोणतंही काम होणार नाही हा गैरसमज तुम्हाला टाळावा लागेल. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लहान-मोठ्यांची गरज लागेल, याची जाणीव ठेवा. लोकांना भेटताना तुमचं वर्तन संतुलित ठेवा. नाही तर लोकांच्या मनात तुमच्याबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते. दुसऱ्या आठवड्यात एखादी प्रभावशाली व्यक्ती किंवा मित्राच्या मदतीने लाभदायक योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. महिन्याच्या उत्तरार्धात काही मुद्द्यांवरून कुटुंबात वाद होऊ शकतात. वाद सोडवताना नातेवाईकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. खूप दिवसांपासून कुठे तरी अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. चैनीशी संबंधित गोष्टींवरही जास्त खर्च होऊ शकतो. मुलाच्या गरजा आणि त्याच्या करिअरबद्दल काळजी वाटेल. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. वैवाहिक जीवनात गोडवा ठेवण्यासाठी जोडीदारासाठी वेळ काढा आणि त्याच्या भावनांचा आदर करा. आरोग्याशी संबंधित समस्येकडे दुर्लक्ष करू नका. आपली दिनचर्या सुधारा.
advertisement
तूळ (Libra) : तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र असेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्याची गाडी कधी थांबताना दिसेल, तर कधी वेगात धावताना दिसेल. महिन्याच्या सुरुवातीला एखाद्या विशिष्ट कामात अपेक्षित यश मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याच्या अनेक संधी मिळतील. लांब किंवा कमी अंतराचा धार्मिक प्रवासदेखील पिकनिक ठरू शकतो. सप्टेंबरच्या पूर्वार्धात करिअर किंवा व्यवसायासाठी पूर्ण प्रयत्न केल्यास यशासोबतच तुम्हाला सन्मानही मिळेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कातून तुम्हाला आर्थिक लाभाची संधी मिळेल. महिन्याच्या मध्यात फायद्याचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. त्या तुलनेत तुमचा खर्च जास्त होईल. या आर्थिक असमतोलामुळे मन चिंतेत राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीबद्दल काळजी वाटेल. महिन्याच्या उत्तरार्धात, कामाच्या ठिकाणी अचानक कामाचा ताण आल्याने किंवा नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. जमीन, वास्तू इत्यादींबाबत कुटुंबातल्या सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. मित्र किंवा प्रेयसीसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीमुळे काळजी वाटू शकते. जोडीदाराशी मतभेद होतील. अशा परिस्थितीत आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं आणि मन शांत ठेवणं शहाणपणाचं ठरेल.
advertisement
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी सप्टेंबरमध्ये राग किंवा भावनेच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नये. वैयक्तिक आयुष्य असो किंवा ऑफिसशी निगडित समस्या असो, आव्हानांपासून दूर पळण्याऐवजी त्यांचा जिद्दीने सामना करा. तुमची कागदपत्रं आणि सामान सुरक्षित ठेवा. कारण, ती गहाळ होण्याची शक्यता आहे. विशेषत: प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्या. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील; पण हातातील संधी सोडू नका. नाही तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा. कारण, दुखापत होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या मध्यात तुमचे विरोधक तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात. करिअर किंवा व्यवसायात इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. महिन्याच्या उत्तरार्धात विरुद्धलिंगी व्यक्तीमुळे तुमच्या अडचणी वाढू शकता. प्रेमसंबंध मजबूत ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याच्या उत्तरार्धात जोडीदाराशी संबंधित गोष्टीमुळे तुमच्या मानसिक तणाव वाढू शकतो.
advertisement
धनू (Sagittarius) : धनू राशीच्या व्यक्तींना सप्टेंबरमध्ये आरोग्य आणि नातेसंबंधांकडे खूप लक्ष द्यावं लागेल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याचा सामना करावा लागू नये, अशी तुमची इच्छा असेल, तर वरिष्ठ किंवा कनिष्ठांशी वैर घेऊ नका. कामात आणि वैयक्तिक आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ध्येयांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळेल; पण तुमचा खर्चही जास्त असेल. प्रवासामुळे थकवा येईल आणि खर्चही जास्त होईल. वाईट गोष्टी घडण्याची भीती राहील. नोकरदारांना नको असलेल्या ठिकाणी बदली होण्याची भीती वाटेल. व्यवसाय किंवा नोकरीत अस्थिरता राहील. महिन्याच्या उत्तरार्धात वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबातल्या सदस्यांशी वाद होऊ शकतो किंवा घरगुती समस्येवर तोडगा निघू शकतो. जमीन आणि इमारतींशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला नवीन अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये खूप विचारपूर्वक पुढे जा. फसवणूक टाळा. नाही तर बदनामी होऊ शकते. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कठीण काळात तुमचा जोडीदार सावलीसारखा सोबत राहील. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये.
advertisement
मकर (Capricorn) : मकर राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबरच्या उत्तरार्धाच्या तुलनेत पूर्वार्ध अधिक शुभ आणि यशदायी असेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. करिअर आणि व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून अत्यंत सावध राहावं लागेल. ते तुमचं काम आणि प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणत्याही कागदावर सही करताना तो नीट वाचा. महिन्याच्या उत्तरार्धात घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. कामाशी संबंधित समस्या तुमच्या काळजीचं कारण बनतील. वाहन काळजीपूर्वक चालवा आणि अंमली पदार्थांपासून दूर राहा. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर विश्वासासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मैत्रिणीची मदत होईल. वैवाहिक जीवनात गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. व्यग्र वेळापत्रकातून जोडीदारासाठी थोडा वेळ काढा.
advertisement
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबरमध्ये कर्मावर अधिक अवलंबून राहावं लागेल. या महिन्यात कठोर परिश्रम आणि अतिरिक्त प्रयत्नांमुळे कामात यश मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने फायद्याचे नवीन स्रोत तयार होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमची मदत करतील. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना टीकाकारांपासून सावध राहावं लागेल. कामासोबतच आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्यावी लागेल. नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या ध्येय साध्य करण्यात अडथळा ठरू शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात एखाद्या विशिष्ट कार्यासाठी प्रयत्न केल्यास संमिश्र परिणाम मिळतील. कोणतंही जोखमीचं काम करणं टाळा. विरोधक सक्रिय होऊन तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात; पण ते तुमचं नुकसान करू शकणार नाहीत. महिन्याच्या सुरुवातीला जोडीदाराशी गैरसमज निर्माण होऊ शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात एखाद्या मित्राच्या किंवा आवडत्या व्यक्तीच्या मदतीने ते सोडवले जातील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. महिन्याच्या उत्तरार्धात मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचं वातावरण राहील.
advertisement
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिना आनंद आणि नशीब घेऊन येणार आहे. या महिन्यात किरकोळ अडथळे येऊनही तुमच्या कामात यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. महिन्याच्या सुरुवातीला मुलांनी मिळवलेल्या यशामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. रोजगारासाठी झटणाऱ्या लोकांची प्रतीक्षा संपेल आणि त्यांना चांगली संधी मिळेल. व्यवसायिकांना अनपेक्षितपणे मार्केटमध्ये तोटा होऊ शकतो. जमीन आणि वास्तूशी संबंधित वादाचा निर्णय तुमच्या बाजूने येईल. महिन्याच्या मध्यात इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. या काळात व्यक्तींच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. लांब किंवा कमी अंतराचा प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल. महिन्याच्या उत्तरार्धात अविवाहितांचे विवाह निश्चित होऊ शकतात. जर तुम्ही एखाद्याला प्रपोझ करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल तर नात्यात परस्पर विश्वास आणि प्रेम वाढेल. कुटुंबातल्या सदस्यांकडून प्रेमविवाहासाठी परवानगी मिळेल. कुटुंबासोबत शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. खूप दिवसांनी आवडत्या व्यक्तीची भेट होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना सर्वसाधारण असेल.