अडचणी संपणार! 6 राशींसाठी नीलम ठरतो वरदान, 'या' एका राशीच्या लोकांचं तर धारण करताच काही तासांमध्येच बदलत नशीब
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
रत्न शास्त्रामध्ये 'नीलम' हा सर्वात शक्तिशाली आणि वेगाने फळ देणारा रत्न मानला जातो. नीलम हा 'न्यायदेवता शनी' यांचा रत्न आहे. असे म्हटले जाते की, जर नीलम एखाद्याला मानवला तर तो रंकाचा राजा करू शकतो, पण जर तो प्रतिकूल ठरला तर मोठे नुकसानही करू शकतो.
रत्न शास्त्रामध्ये 'नीलम' हा सर्वात शक्तिशाली आणि वेगाने फळ देणारा रत्न मानला जातो. नीलम हा 'न्यायदेवता शनी' यांचा रत्न आहे. असे म्हटले जाते की, जर नीलम एखाद्याला मानवला तर तो रंकाचा राजा करू शकतो, पण जर तो प्रतिकूल ठरला तर मोठे नुकसानही करू शकतो. शनीची स्थिती पाहता, कोणत्या राशींनी हा रत्न धारण करावा आणि त्याचे काय नियम आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
या 6 राशींसाठी आहे अत्यंत शुभ: रत्न शास्त्रानुसार, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी नीलम हा त्यांचा राशीस्वामी शनीचा रत्न असल्याने सर्वात उत्तम आहे. याशिवाय शनी हा वृषभ, मिथुन, कन्या आणि तूळ राशीच्या लोकांसाठी 'मित्र' ग्रह मानला जातो. त्यामुळे या सहा राशींचे जातक कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून नीलम धारण करू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
रत्नाची 'चाचणी' करणे अनिवार्य: नीलम परिधान करण्यापूर्वी तो तुम्हाला मानवतोय की नाही, याची चाचणी करणे गरजेचे आहे. यासाठी शनिवारी रात्री तो रत्न निळ्या कापडात गुंडाळून उशाखाली ठेवून झोपावे. जर तुम्हाला शांत झोप लागली आणि शुभ स्वप्न पडले, तरच तो परिधान करावा. भीतीदायक स्वप्ने किंवा अस्वस्थता जाणवल्यास तो धारण करू नये.
advertisement
advertisement
कोणाचे नशीब रातोरात पालटते? ज्यांच्या कुंडलीत शनी उच्च स्थानी आहे किंवा केंद्र-त्रिकोणात शुभ स्थितीत आहे, अशा व्यक्तींना नीलम परिधान केल्यावर अवघ्या काही तासांतच सकारात्मक परिणाम दिसू लागतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








