'ते नसते, तर मी मेलो असतो', शूटिंग करणं जीवावर बेतलं; जितेंद्र जोशीसोबत घडला भयंकर प्रकार, थोडक्यात वाचला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jitendra Joshi: मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशी हा आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतण्यासाठी ओळखला जातो. पण कधीकधी हीच जिद्द कलाकाराच्या जीवावर बेतू शकते, याची प्रचिती नुकतीच आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जितेंद्र सांगतो, "स्टंट मॅनने माझ्या मानेला फास लावला आणि मी त्या फासाला लटकलो होतो. दिग्दर्शकाने ॲक्शन म्हटलं आणि स्टूल काढलं गेलं. त्यानंतर काय झालं, मला काहीच आठवत नाहीये. मला फक्त इतकंच आठवतंय की मी झाडाला लटकलोय आणि लोक मला वाचवण्यासाठी ओरडत माझ्याकडे धावत येत आहेत. मधले काही क्षण माझ्या स्मृतीतून पूर्णपणे पुसले गेले आहेत."
advertisement
दिग्दर्शक रवी करमरकर यांनी मॉनिटरवर हा सर्व प्रकार पाहिला. त्यांना क्षणार्धात जाणवलं की जितेंद्रला खरंच श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्याच्या हालचाली बदलल्या आहेत. रवींनी तात्काळ ओरडून शूटिंग थांबवलं. सर्व क्रू मेंबर्सनी धावत जाऊन जितेंद्रला खाली उतरवलं. जवळपास दोन मिनिटं जितेंद्रच्या गळ्याला घट्ट फास बसला होता.
advertisement









