Kitchen Vastu Tips: रोज किचनमध्ये लागणाऱ्या या 2 गोष्टी जवळ-जवळ ठेवण्याची चूक टाळा; अडचणींचे मूळ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रात घरातील किचनला विशेष महत्त्व आहे. किचन म्हणजे घराच्या ऊर्जेचे केंद्र मानले जाते. येथील प्रत्येक गोष्टीचा परिणाम घराच्या वातावरणावर आणि तिथे राहणाऱ्या लोकांवर होतो. अनेक स्त्रिया रोजच्या सोयीसाठी स्वयंपाकघरातील सर्व मसाले एकाच ठिकाणी किंवा एकाच मसाल्याच्या डब्यात ठेवतात. मीठ आणि हळद यांचा वापर रोज होत असल्याने ते अनेकदा सोबतच ठेवले जातात. पण ज्योतिष आणि वास्तुशास्त्राशी संबंधित मान्यतेनुसार, किचनमध्ये काही गोष्टी एकत्र ठेवणे योग्य मानले जात नाही. विशेषतः मीठ आणि हळद एकाच ठिकाणी ठेवल्याने घरात नकारात्मक परिणाम वाढू शकतात.
advertisement
मिठाचा ग्रहांशी असलेला संबंध - ज्योतिष शास्त्रानुसार मिठाचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी मानला जातो. त्यामुळे मिठाचा परिणाम मन आणि भावनांवर होतो. जर मीठ योग्य ठिकाणी ठेवले नाही, तर व्यक्तीच्या स्वभावात चिडचिडेपणा आणि अस्थिरता वाढू शकते. म्हणून मीठ नेहमी स्वतंत्र आणि स्वच्छ भांड्यात ठेवणे चांगले मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हळद ठेवण्याची योग्य जागा - हळद किचनमध्ये स्वतंत्र डब्यात ठेवा आणि मिठापासून अंतर राखा. याशिवाय हळकुंडाची एक गाठ लाल कपड्यात बांधून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवली जाऊ शकते. यामुळे पैशांशी संबंधित अडचणी कमी होतात आणि घरात बरकत राहते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)











