Shani Astro: संथगती शनी पुन्हा चाल बदलणार! तीन राशींची आर्थिक प्रगती वेगात; मार्गातील अडचणी दूर
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Vakri 2025 Rashi Effiect: शनी, शनी, शनी... शनिची भीती ज्याला त्याला असते. साडेसाती नको रे देवा, असे म्हणत अनेकजण शनिच्या वक्रदृष्टीला घाबरतात. वर्ष 2025 हे शनिच्या राशी परिवर्तनाचे वर्ष होते, मार्च महिन्यात शनिने अडीच वर्षानंतर राशी पालट केला. ज्योतिषशास्त्रातील मोठी घटना मार्च महिन्याच्या शेवटी घडली. शनीचे राशीपरिवर्तन मीन राशीत झाले. शनी आता या राशीतच वक्री होणार. वक्री शनी काही राशींचे भाग्य उजळवू शकतो. करिअर आणि व्यवसायात उत्तुंग यश मिळू शकेल.
advertisement
शनी एकूण १३८ दिवसांसाठी वक्री असेल रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ०९:३६ वाजता शनि ग्रह वक्री चाल सुरू करेल आणि २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत या स्थिती असेल. अशाप्रकारे शनी १३८ दिवस वक्री स्थितीत असेल. त्याच्या स्थितीचा काही राशींवर खूप शुभ प्रभाव पडेल. त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
मिथुन - पहिली रास म्हणजे मिथुन, मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री स्थिती शुभ ठरू शकते. मिथुन राशीच्या दहाव्या भावात शनिदेव वक्री चाल करणार आहेत आणि हे कर्म घर आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या व्यक्ती त्यांच्या कारकिर्दीत अनपेक्षितपणे प्रगती करू शकतील. व्यवसायात मोठी रक्कम मिळू शकते. आर्थिक लाभ संभवतो, चौफेर प्रगतीची शक्यता आहे.
advertisement
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री गती शुभ ठरू शकते. कर्क राशीच्या नवव्या घरात शनि वक्री होत आहे, ते भाग्याचे घर आहे. अशा परिस्थितीत या काळात व्यक्तीचे भाग्य चमकेल. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यानं तुम्हाला सर्वत्र यश मिळेल. विविध गोष्टी मनासारख्या जुळून येतील.
advertisement
कुंभ - शनि वक्री असल्याने कुंभ राशीच्या लोकांना बरेच फायदेच मिळतील. धन आणि वाणीचे घर असलेल्या कुंभ राशीच्या दुसऱ्या घरात शनि वक्री होईल. यामुळे कुंभ राशीचे लोक व्यवसायात अधिकाधिक पैसे कमवू शकतील. तुम्हाला भौतिक सुख मिळू शकेल. कीर्ती आणि आदर वाढवण्यास सुरुवात होणार आहे. वाणी मधूर ठेवल्यास कामे झटपट होतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)