Astrology: भयंकर वादळी काळ! 27 वर्षांनी शनि-शुक्र एकाच नक्षत्रात आले; या राशींना बसणार असह्य चटके
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: दिनांक २८ एप्रिल रोजी शनी ग्रह उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करत आहे, या नक्षत्राचे स्वामी स्वतः भगवान शनिदेव आहेत. शनिदेवाच्या आधी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात शुक्र ग्रहाचे भ्रमण झाले आहे, त्यामुळे एकाच नक्षत्रात शनि आणि शुक्राची युती होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि २७ वर्षांनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात भ्रमण करत आहे, सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात हळू चालतो आणि या नक्षत्रात आल्यानं शनी शुक्राशी भेटत आहे, ज्यामुळे ४ राशींच्या जीवनात मोठी उलथापालथ होऊ शकते. शनीची चाल बदलते तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. शनि आणि शुक्र यांच्या युतीमुळे काही राशींचा भयंकर वाईट काळ सुरू होणार आहे.
वृषभ राशीवर शनि-शुक्र युतीचा प्रभाव - शनि आणि शुक्र एकाच नक्षत्रात असल्याने वृषभ राशीच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या काळात तुम्हाला प्रत्येक बाबतीत खूप काळजीपूर्वक काम करावे लागेल. नोकरी करणाऱ्यांनी कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा लागेल.
advertisement
advertisement
शनि-शुक्र युतीचा कर्क राशीवर परिणाम - शनि आणि शुक्र एकाच राशीत असल्याने कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या खर्चाकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच, व्यावसायिकांचा व्यावसायिक भागीदारांवरील विश्वास उडू शकतो, ज्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.
advertisement
advertisement
शनि-शुक्र युतीचा धनु राशीवर परिणाम - एकाच नक्षत्रात शनि आणि शुक्र यांच्या युतीमुळे धनु राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चिंता वाढू शकतात. नशिबाची साथ नसल्यानं तुमचे सर्व नियोजन अयशस्वी होऊ शकते, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे तुमचे कर्ज वाढू शकते. शनि आणि शुक्र यांच्या युतीच्या अशुभ प्रभावामुळे नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबात अंतर्गत कलह वाढू शकतो, त्यानं मानसिक ताण येऊ शकतो.
advertisement
शनि-शुक्र युतीचा कुंभ राशीवर परिणाम - एकाच नक्षत्रात शनि आणि शुक्र यांच्या युतीमुळे, कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ शकणार नाही, नाहक प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. शनी आणि शुक्र यांच्या युतीमुळे, नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल, ज्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे धाव घ्यावी लागू शकते. या काळात कोणत्याही प्रकारचा वाद टाळा, अन्यथा तुम्ही कोर्ट केसेसमध्ये अडकू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)