shadashtak yog: शनि-केतुचा षडाष्टक योग! 4 राशींना मिळणार नशीबाची साथ, डबल होणार बँक बॅलन्स
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Ketu Gochar Effect 2024 : ज्योतिषशास्त्रात केतूला छाया ग्रह आणि शनिला न्यायाची देवता मानलं जातं. 2024 मध्ये केतू कन्या राशीत असेल. केतू दीड वर्षात आपली राशी बदलतो. 30 ऑक्टोबर 2023 रोजी केतूने कन्या राशीत प्रवेश केला होता आणि आता संपूर्ण 2024 मध्ये याच राशीत राहील. शनिदेव कुंभ राशीत आहेत आणि तेही 2024 मध्ये वर्षभर याच राशीत राहतील. अशा प्रकारे शनि आणि केतूच्या स्थितीमुळे षडाष्टक योग तयार होईल.
2024 मध्ये सर्व 12 राशींवर या योगाचा मोठा प्रभाव पडेल. राशीनुसार हा प्रभाव शुभ किंवा अशुभ असू शकतो. 4 राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग अतिशय शुभ असणार आहे. या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नोकरीत असलेल्यांना एकामागून एक मोठ्या ऑफर मिळू शकतात. तुम्हाला उच्च पदाची आणि जास्त पगाराची नोकरी मिळू शकते. जीवनातील सर्व समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळेल. 2024 मध्ये शनि-केतू कोणत्या राशींचे भाग्य उजळवेल हे जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


