Astrology: खूप काळानंतर शशी-आदित्य योग जुळला! या राशींचा आता सुवर्णकाळ, मोठे आर्थिक लाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sashiaditya Raj Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ठराविक काळानंतर ग्रह संक्रमण करतात, जून महिन्याच्या शेवटी अनेक ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल पाहायला मिळत आहेत. यातून काही शुभ आणि राजयोग निर्माण होत आहेत, त्याचा प्रभाव साहजिकच संपूर्ण राशीचक्रावर दिसून येतो. आज २४ जून रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, याठिकाणी गुरु आणि सूर्यदेव आधीच ठिय्या देऊन बसले आहेत.
advertisement
मिथुन - शशी आदित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीत लग्नाच्या भावावर तयार होणार आहे. त्यामुळे, कोणत्याही कामात आत्मविश्वास वाढू शकतो. नवीन सुरुवात किंवा वैयक्तिक ब्रँडिंगसाठी हा योग्य काळ आहे. बोलण्यात भावनिक टच असल्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. हा राजयोग लेखन, कला किंवा अध्यापन यासारख्या सर्जनशील गोष्टींसाठी शुभ आहे. तसेच, या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले स्थळ मिळू शकते.
advertisement
कन्या - शशी आदित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या कर्मभावावर तयार होत आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला काम-व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. तसेच, हा काळ व्यावसायिक सौदे, सोशल नेटवर्किंग किंवा ग्रुप प्रोजेक्टसाठी शुभ आहे.
advertisement
advertisement
धनू - शशी आदित्य राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी चांगला ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या सातव्या भावावर तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात लाभ मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. तसेच, प्रेम संबंध चांगले होतील, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे.
advertisement
या काळात धनू राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात अभ्यास, प्रवास योजना किंवा लेखनाशी संबंधित कामात प्रगती होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


