Malavya Yog: 500 वर्षांनी मालव्य योग जुळला! 3 राशींच्या लोकांची मोठी चिंता दूर होणार, पैसा थेट खात्यात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Malavya Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हिंदू सणांमुळे वेळोवेळी काही दुर्मीळ योगायोग जुळून येतात, त्याचा परिणाम मानवी जीवनावर म्हणजेच संपूर्ण राशीचक्रावर दिसून येतो. यंदा श्रावणामध्ये ग्रहांचे एक अत्यंत दुर्मीळ संयोजन तयार होईल. यावेळी ५०० वर्षांनंतर श्रावण महिन्यात तीन राजयोग एकत्रितपणे जोरदार प्रभावी होतील.
ग्रहांचा राजा सूर्य आणि बुध यांच्या युतीने बधादित्य राजयोग तयार होईल. तर शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत असल्यानं मालव्य राजयोग निर्माण करेल. तर २६ जुलै रोजी गुरु आणि शुक्र यांची युती मिथुन राशीत असेल, ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल. ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. या राशींना अचानक आर्थिक लाभासह प्रगतीची शक्यता आहे. जाणून घेऊया की या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
मिथुन - ३ राजयोगांची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या राशीतच गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच या काळात तुम्हाला संपत्तीचा लाभ मिळू शकेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता. समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल. त्याचबरोबर तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तसेच या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते.
advertisement
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. कर्क राशीत बुध आणि सूर्याची युती होईल. तसेच, या काळात तुमचे ज्ञान वाढेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. लवकरच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये याचे फायदे दिसतील. या काळात, तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. तसेच यावेळी तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)