Gajkesari Rajyog 2025: 24 तासात अक्षय तृतियेला मालव्य आणि गजकेसरी राजयोग! या राशींचे भाग्य उजळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Malavya And Gajkesari Rajyog 2025: वैदिक कॅलेंडरनुसार, यावर्षीची अक्षय तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोगही घडत आहेत. अक्षय तृतियेदिवशी गजकेसरी आणि मालव्य राजयोग तयार होणार आहेत.
advertisement
advertisement
धनु - गजकेसरी आणि मालव्य राजयोगाच्या निर्मितीसह, धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण तुमच्या राशीच्या सुख आणि संपत्तीच्या घरावर चंद्र आणि गुरुची युती होणार आहे. त्यामुळे, या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील. तसेच, मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक वाद सोडवले जाऊ शकतात. आईसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो, त्याचबरोबर सरकारी कामात यश आणि पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
मीन - गजकेसरी आणि मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात मालव्य राजयोग तयार होत आहे. तर तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरात गजकेसरी राज योग तयार होत आहे. त्यामुळे, या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. शिवाय, धैर्य आणि शौर्य वाढेल. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो, त्याचबरोबर सरकारी कामात यश आणि पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
advertisement
advertisement
मिथुन राशीच्या लोकांना या काळात, जीवनात सुखसोयी आणि सुविधा वाढतील, कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. यावेळी, तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)