Surya grahan 2025: फक्त 15 दिवसात दुसरं ग्रहण..! 21 सप्टेंबरपासून या राशींच्या मागे भयंकर अडचणी लागणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya grahan 2025: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण कन्या राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. सूर्यग्रहणादिवशीच सर्वपित्री अमावस्या आली आहे. ज्योतिषशास्त्रात 15 दिवसांच्या कालावधीत दोन ग्रहणं होणं अशुभ मानतात.
advertisement
कन्या - वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीत होईल. त्यामुळे या राशीवर ग्रहणाचा सर्वाधिक परिणाम होईल. उत्पन्नाच्या स्रोतांवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कर्ज घेतलेले किंवा गुंतवलेले पैसे गमावले जाऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेबाबतही तुम्हाला अडचणी येऊ शकतात. या काळात आर्थिक आघाडीवर काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
advertisement
कुंभ - 7 सप्टेंबरचे चंद्रग्रहण कुंभ राशीत झालं. शनीच्या अधिपत्याखाली असलेल्या कुंभ राशीवर ग्रहणाचा दुप्पट परिणाम होईल. शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा देखील कुंभ राशीत सुरू आहे. परिणामी, तुम्हाला अनपेक्षित आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. अचानक अपघात होण्याची शक्यता देखील आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी एक छोटीशी चूक महागात पडू शकते.
advertisement
मीन - सध्या शनी मीन राशीत असून साडेसातीचा दुसरा टप्पा तुमच्या राशीत सुरू आहे. 15 दिवसांत दोन ग्रहणे मीन राशीसाठी चांगली मानली जात नाहीत. हा दुर्मिळ योगायोग पती-पत्नीमधील संबंध बिघडलू शकतो. तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात मोठ्या अडचणी येऊ शकतात. व्यवसायात नुकसान होऊ शकते. उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. निधीचा अभाव चिंता निर्माण करू शकतो.
advertisement
सूर्यग्रहणाचा सुतक काळ वैध आहे?
21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. म्हणून, या सूर्यग्रहणाचा सुतक काळ भारतात वैध असणार नाही, पूजा किंवा इतर दैनंदिन कामांवर परिणाम होणार नाही. सूर्यग्रहण सर्वपितृ अमावस्ये दिवशीच आले असले तरी श्राद्ध विधींवर परिणाम होणार नाही. पूर्वजांसाठी श्राद्ध आणि पिंडदान करण्यामध्ये सूर्यग्रहणाची अडचण नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)